वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात शुबमन गिल आउट झाल्यानंतर बराच गोंधळ झाला. त्याची विकेट गेली तो चेंडू फिल्डरने कॅच पकडण्यापूर्वी थोडासा गवताला स्पर्श झाला होता. असं असतानाही थर्ड अंपायरने शुबमनला आउट घोषित केलं. यामुळे चाहते संतापल्याचं पाहायला मिळालं. तर, याच निर्णयावरून अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्टोरी पोस्ट करत अंपायरला टोला लगावला.

Video: “गमावलं ना मी तुला”! मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात, कारचा झाला चेंदामेंदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

इंस्टाग्राम स्टोरीवर श्रद्धा कपूरने हातात काही बदाम घेतल्याचा फोटो पोस्ट केला. त्यात तिने थर्ड अंपायरला बदाम ऑफर केले आणि त्याने दिलेल्या निर्णयाबद्दल टोला लगावला. “मी थर्ड अंपायरला बदाम ऑफर करताना” असं कॅप्शन देत श्रद्धाने हा फोटो पोस्ट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
shraddha kapoor
श्रद्धा कपूरची इन्स्टाग्राम स्टोरी

श्रद्धा कपूर क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. तिला क्रिकेटचे सामने पाहायला खूप आवडतं. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीतून तिचं क्रिकेटवर असलेलं प्रेम दिसून येतं. दरम्यान, श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाच्या यशानंतर ती तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.