श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सर्वात प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपल्या साधेपणाने नेहमीच लोकांची मनं जिंकत असते. आता पुन्हा एकदा श्रद्धाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यातील तिचा साधेपणा पाहून नेटकरी तिचं खूप कौतुक करत आहेत.

हेही वाचा – सई ताम्हणकर बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर फिरतेय स्पेन; ‘त्या’ एका फोटोने उलगडलं गुपित

श्रद्धा आलिशान कार सोडून ऑटोरिक्षाने मैत्रिणीबरोबर प्रवास करून आली. ती तिच्या एका मैत्रिणीबरोबर रिक्षाने कॅफेमध्ये पोहोचली. ती कार घेऊन का आली नाही, याबद्दल विचारले असता, तिने उत्तर दिले की ‘ऑटो सर्वात उत्तम आहेत आणि ऑटो सारखं काहीच नाही’. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी श्रद्धाने पापाराझींबरोबर मराठीमध्ये गप्पा मारल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. ‘तिचा साधेपणाच तिला खूप चांगली व्यक्ती बनवतो’, असं एका युजरने म्हटलं आहे. तर, काहींनी तिच्या उत्तम मराठीचंही कौतुक केलंय. दरम्यान, श्रद्धाने आलिशान कार सोडून रिक्षाने प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेकदा श्रद्धाने रिक्षाने प्रवास केला आहे.