चित्रपटसृष्टीतील कलाकारांना जितकी प्रिसिद्धी मिळते, तितकीच प्रसिद्धी त्यांच्या मुलांनादेखील मिळताना दिसते. कलाकारांप्रमाणेच त्यांच्या मुलांचेदेखील चाहते असतात. आता अभिनेत्री श्रुती हासन(Shruti Haasan)ने वडिलांना मिळत असलेल्या लोकप्रियतेच्या काळात लहानाचे मोठे होण्याचा अनुभव कसा होता? याबरोबरच कमल हासन तिचे वडील असल्याचे ती लपवत असे, ती असे का करत होती, यावर अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली श्रुती हसन?

श्रुती हासनने नुकतीच मदन गौरींना मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वडिलांविषयी बोलताना म्हटले, “लोक सतत मला त्यांच्याबद्दल विचारत राहायचे. मला असे वाटायचे की मी श्रुती आहे. मला स्वत:ची वेगळी ओळख हवी आहे. लोक माझ्याकडे बोट दाखवायचे आणि म्हणायचे ती कमलची मुलगी आहे. जर मला कोणी विचारले तर सांगायचे की मी डॉक्टर रामचंद्रन यांची मुलगी आहे आणि माझे नाव पूजा रामचंद्रन आहे. डॉक्टर रामचंद्रन आमचे डेन्स्टिंट होते आणि मी स्वत:चे पूजा असे नाव सांगत असे.”

वडिलांची प्रसिद्धी नाकारून चेन्नईमध्ये मोठे होणे किती अवघड होते? यावर बोलताना श्रुतीने म्हटले, “माझे वडील अभिनेते आहेत किंवा लोकप्रिय आहेत, ही फक्त इतकीच गोष्ट नव्हती. मला लहानपणापासून माहित आहे की आतापर्यंत मी जितक्या लोकांना भेटले आहे, त्या सगळ्यापासून ते वेगळे आहेत. मला दोन हट्टी लोकांनी वाढवले आहे. आई आणि वडीलांमध्ये मी आणि माझी बहीण अडकलेलो असायचो. जेव्हा माझे आई-वडील वेगळे झाले, तेव्हा मी मुंबईला शिफ्ट झाले. मी श्रुती असण्याचा कधीच आनंद घेऊ शकले नाही. जेव्हा माझ्या वडिलांचे सगळीकडे पोस्टर लावलेले असे, तेव्हा त्यांच्या लोकप्रियतेपासून वेगळे होणे अवघड होते. मात्र आज मला कमल हासनशिवाय श्रुतीची कल्पना सुद्धा करायची नाही.”

हेही वाचा: ‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रुतीबद्दल बोलायचे तर ती स्वत: नावाजलेली अभिनेत्री आहे. २००९ मध्ये श्रुतीने ‘लक’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. २०११ मध्ये तिने तेलुगु आणि तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अभिनयाशिवाय श्रुती पार्श्वगायिकादेखील आहे. तिचा स्वत:चा म्युझिक बँडदेखील आहे. ती नुकतीच प्रशांत नील यांच्या ‘सालार पार्ट १: सीजफायर’ मध्ये दिसली होती. आगामी काळात ती ‘सालार पार्ट २’ आणि रजनीकांत यांच्याबरोबर कूली चित्रपटात दिसणार आहे.