कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा रंगला. लग्नानंतर दोन दिवसातच त्यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला. व्हिडीओमध्ये वाचत असलेल्या ‘रांझा’ गाण्याच्या या व्हर्जन्य सगळयांचंच लक्ष वेधून घेतलं. पण हे गाणं चित्रपटातील नसून खास सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी तयार करण्यात आलं आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला सिद्धार्थ कियाराची वाट पाहताना दिसला. या व्हिडीओमध्ये कियाराने ‘रांझा’ गाण्यावर नाचून एन्ट्री केली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना हार घातले आणि त्यांनी हार घालतात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झालेला दिसला. तसंच कियारा व सिद्धार्थने एकमेकांना किस केलं. या व्हिडीओमध्ये ‘रांझा’ गाण्याचं नवीन व्हर्जन प्रेक्षकांसमोर आलं. सर्वांना इतकं आवडलं की अनेक जण हे गाणं इंटरनेटवर शोधू लागले. तर काहींनी हे गाणं रिलीज करण्याची विनंतीही केली. पण ‘रांझा’ गाण्याच्या या व्हर्जनची एक रंजक गोष्ट आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थ-कियाराने लग्नाच्या २ दिवसांतच रचला नवा विक्रम, ‘या’ बाबतीत रणबीर-आलियाही टाकलं मागे

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे शूटिंग करणाऱ्या व्हिडीओग्राफरने हा व्हिडीओ त्याच्या यू ट्यूब चॅनलवर शेअर करत ही गोष्ट सांगितली. त्याने लिहिलं, “खूप कमी जण त्यांचं प्रेम उदारपणे जगासमोर मांडतात. कियाराला त्यांच्या लग्नात रांझा गाण्यावर नाचत सिद्धार्थला हार घालण्यासाठी यायचं होतं. पण “‘रांझा’ गाणं एक सॅड सॉंग आहे” असं मी तिला म्हणालो. त्यावर “पण हे आमचं गाणं आहे” असं ती मला म्हणाली. मग आम्ही या गाण्याचे त्या प्रसंगाला साजेसे बोल लिहिले आणि ते गाणं नव्याने रेकॉर्ड केलं आणि प्रत्येकाचंच स्वप्न पूर्ण झालं.”

हेही वाचा : एक्स गर्लफ्रेंडने दिलेल्या शुभेच्छांवर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आलिया…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा हा व्हिडीओ सुपरहिट झाला. अजूनही या व्हिडीओवर नेटकरी भरभरून प्रेम दर्शवत आहेत. त्यांचा शाही विवाह सोहळा ५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी रंगला. तर कालच मुंबईत त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन झालं. त्यामुळे आता सध्या सिद्धार्थ-कियाराची सर्वत्र चर्चा आहे.