आजकाल बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट आणि ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर अथवा त्यातील गाण्यामधील चुका काढून त्या ट्रोल केल्या जातात. सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. असाच एक चित्रपट सध्या ट्रोल होताना दिसून येत आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा ‘मिशन मजनू’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र भारतात नव्हे तर पाकिस्तानात ट्रोल केलं जात आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, सिद्धार्थ मल्होत्राचा ‘मिशन मजनू’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा भारताने आखलेल्या एका मोहिमेभोवती फिरते. सिद्धार्थ मल्होत्रा हा गुप्तहेर दाखवण्यात आला आहे. भारताकडून त्याला पाकिस्तानात एक मिशनसाठी पाठवले जाते. तिकडे त्याचे प्रेमप्रकरण जमते, अशी कथा चित्रपटाची आहे. मात्र चित्रपटाला पाकिस्तानातील जनतेने ट्रोल केलं आहे.
निळू फुलेंच्या बायोपिकच्या तयारीला लागला प्रसाद ओक; म्हणाला, “या चित्रपटाची…”
चित्रपटाला ट्रोल करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे यातील भाषा. चित्रपटात उर्दूचा मोठया प्रमाणावर वापर केला आहे. या चित्रपटात सब टायटलमध्ये उर्दू भाषेतील शब्दांचे चुकीचे स्पेलिंग लिहले गेले आहे. तर पाहू उर्दू शब्दांचा चुकीचा अनुवाद लिहला गेला आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की बॉलिवूडला उर्दू मजकूर कसा टाईप करायचा हे देखील माहित नाही.
सिद्धार्थच्या बरोबरीने या चित्रपटात परमीत सेठी, शारीब हाश्मी, कुमुद मिश्रा, झाकीर हुसेन आणि मीर सरवर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शंतनू बागची दिग्दर्शित हा चित्रपट २० जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.