सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ निगम देखील सलमानच्या या चित्रपटात झळकणार आहे. सिद्धार्थने लहान वयातच अनेक संकटांचा सामना केला, वडिलांना गमावल्यानंतर आर्थिक संकटं पाहिली, पण तो खचला नाही.

“आई व बहीण बाहेर, त्याने काचेच्या खोलीत मला मागून पकडलं अन्…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

सिद्धार्थ निगम २२ वर्षांचा आहे. तो एक अभिनेता, सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर व राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टही आहे. सिद्धार्थ मुळचा अलाहाबादचा आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने लहान वयातच मोठे नाव कमावले आहे. सिद्धार्थने लहानपणीच वडील गमावले होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने जिम्नॅस्टिक्स करायला सुरुवात केली.

१४ वर्षे मोठ्या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ, ५ वर्ष होऊनही आई बनू शकत नव्हती सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता गुडन्यूज देत म्हणाली, “माझी पाळी…”

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं. “आम्ही अलाहाबादच्या एका छोट्या गावात राहायचो. मी लहान असताना माझ्याकडून कोणालाच काही अपेक्षा नव्हत्या, कारण मी अभ्यासात हुशार नव्हतो, माझी काही स्वप्नही नव्हती. लहान वयात वडील गमावल्यावर आता काहीच उरलं नाहीये, असं वाटू लागलं. आम्हा सगळ्यांची जबाबदारी आईवर पडली. अनेकदा आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही उपाशी असायचो. मी खेळात चांगला होतो म्हणून मी जिम्नॅस्टिक्सची निवड केली. त्यामुळे मला हॉस्टेलमध्ये खोली आणि जेवण मिळू लागले. अशा रीतीने आईचं थोडं ओझं कमी झालं,” असं सिद्धार्थ म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘बॉर्नव्हिटा’च्या जाहिरातीतून झाली. यानंतर सिद्धार्थने ‘धूम ३’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यात सिद्धार्थने आमिर खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सिद्धार्थ निगमने अनेक हिट टीव्ही शो केले. त्याने ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेत दमदार अभिनय करून सर्वांची मने जिंकली. सम्राट अशोकाची भूमिका साकारून तो लोकप्रिय झाला. याशिवाय सिद्धार्थ ‘अलादीन’ आणि ‘चंद्रनंदिनी’ यांसारख्या मालिकांमध्येही दिसला होता. आता तो सलमानच्या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.