सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या नावाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघंही सार्वजनिक ठिकाणी दिसले. अलिकडेच या दोघांच्या संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशात आता सिद्धार्थ कियाराचा एअरपोर्ट लूक चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. एवढंच नाही तर या लूकमुळे कियारा अडवाणीला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी याचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसत आहेत. एकमेकांचा हात पकडलेले सिद्धार्थ-कियारा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडप्रणाणे दिसत आहेत. एकीकडे या दोघांमधील बॉन्डिंग नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे या व्हिडीओवरून कियारा मात्र नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली असून तिला ट्रोल केलं जात आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! उर्फी जावेदचं सामान घेऊन कॅब ड्रायव्हर गेला पळून, नंतर नशेत परत आला अन्…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि पर्पल रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसतोय तर कियारा अडवाणी पूर्णपणे पांढऱ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसत आहे. गॉगल लावून दोघंही स्वॅग अंदाजात एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना काही लोकांनी या जोडीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र कियाराच्या या लूकवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा- Photos : कियारा अडवाणीच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, डिझाईनची सोशल मीडियावर चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ना गळ्यात मंगळसूत्र, ना भांगेत सिंदूर आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या कियाराचा हा अंदाज नेटकऱ्यांना अजिबात आवडलेलं नाही. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करताना वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “यांना नेहमी फक्त फॅशन सुचते. ना मंगळसूत्र ना सिंदूर.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “हे अद्याप अविवाहित दिसत आहेत असं का?” याशिवाय आणखी काही युजर्सनी कियाराच्या लूकवरून तिला ट्रोल केलं आहे.