सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. कियारा-सिद्धार्थच्या विवाहसोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराने दिल्लीत पापाराझींना मिठाई वाटली. याचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधील नवविवाहित जोडी लग्नानंतर खूश असल्याचं पाहायला मिळत आहे. कियारा-सिद्धार्थने मनिष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेल्या लाल रंगाच्या कपड्यांत ट्विनिंग केलं होतं. सिद्धार्थने लाल रंगाचा कुर्ता, पायजमा व त्यावर डिझायनर शाल घेतली होती. तर कियाराने लाल रंगाचा ओढणी ड्रेस परिधान केला होता.

हेही वाचा>> “मला याची सवय…” चित्रपटातील किसिंग सीनबाबत बोलताना ललित प्रभाकरने केलेलं वक्तव्य चर्चेत

कियारा हातात चुडा, भांगेत कुंकू, गळ्यात मंळसूत्र अशी नववधूप्रमाणे नटली होती. या सगळ्यात कियाराच्या मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं. कियाराच्या साध्या पण हटके मंगळसूत्राची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कियाराच्या नववधू लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा>> राखी सावंतच्या वकिलाचे आदिल खानवर गंभीर आरोप, म्हणाले “तिचे व्हिडीओ बनवून…”

सिद्धार्थ-कियारा गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. शेरशाह चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता खऱ्या आयुष्यातही ते विवाहबंधनात अडकल्यामुळे चाहते खूश आहेत.