काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. या महिन्यात सिद्धूची आई चरण कौर एका गोंडस बाळाला जन्म देणार असल्याची आनंदीची बातमी व्हायरल झाली होती. सिद्धू मुसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी या बातमीला दुजोरा दिला. तेव्हापासून सिद्धू मुसेवाला चर्चेत आला आहे.

सिद्धू मुसेवालाचे काका चमकौर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर गर्भवती राहिल्या आहेत. या महिन्यात त्या एका गोंडस बाळाला जन्म देणार आहेत. त्यामुळे सध्या मुसेवाला कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून घराला वारस मिळण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी पुन्हा एकदा पालक होण्याचा निर्णय घेतला. लवकरच सिद्धू मुसेवालाच्या घरी पाळणा हलणार आहे. त्यामुळे सिद्धू मागे सोडून गेलेल्या संपत्तीचा नवा वारस मिळणार आहे. सिद्धू किती संपत्तीचा मालक आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – मुग्धा वैशंपायनला अंदमानच्या समुद्रात पाय बुडवण्याचा आवरला नाही मोह, म्हणाली, “गेली दोन वर्ष…”

सिद्धू मुसेवालाकडे अमाप संपत्ती असल्याचं म्हटलं जात आहे. सिद्ध हा फक्त देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय होता. ‘जी वैगन’, ‘टोचन’, पंजाबी चित्रपट ‘डाकुआ दा मुंडा’, ‘डॉलर सॉन्ग’ आणि ‘जट्टा दा मुकाबला’ अशा सिद्धूच्या अनेक गाण्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तो प्रत्येक एका गाण्यातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धूच्या निधनानंतर नेटवर्थसंबंधित आलेल्या बातम्यांनुसार, तो १४ मिलियन म्हणजे ११४ कोटी रुपये मागे सोडून गेला आहे. सिद्धू एका लाइव्ह कॉन्सर्टसाठी २१ लाख रुपये मानधन घेतं असे. ऑस्ट्रेलियापासून ते अमेरिका आणि कॅनडापर्यंत त्याच्या कॉन्सर्टची मागणी होती. सिद्धूकडे आलिशान गाड्या होत्या. रेंज रोवर, इसुजू डी-मॅक्स, मर्सिडीज एएमजी 63, मस्टँग, फॉर्च्यूनर, जीप आणि टोयोटा यांसारख्या आलिशान गाड्या होत्या. याशिवाय सिद्धूला महागड्या बाइक्सची देखील खूप आवड होती. पंजाब, कॅनडामध्ये सिद्धूचं आलिशान घर आहे. सिद्धूच्या निधनानंतर त्याच्या गाण्यातून जबरदस्त कमाई झाली आहे.