सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच सिद्धू मुसेवालाच्या घरी चिमुकल्या बाळाची पाऊलवाट उमटणार आहे. पुढच्या महिन्यात सिद्धूची आई चरण कौर वयाच्या पन्नाशीत एका गोंडस बाळाला जन्म देणार आहेत. सिद्धूच्या हत्येनंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून घराला वारस असण्यासाठी सिद्धू मुसेवालाच्या आई-वडिलांनी हा निर्णय घेतला. माहितीनुसार, आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर गर्भवती असून पुढच्या महिन्यात त्या एका गोंडस बाळाला जन्म देणार आहेत. चरण कौर या पुन्हा आई होणार असल्याच्या वृत्ताला सिद्धू मुसेवालेचे काका चमकौर सिंह यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – ‘तान्हाजी’ फेम अभिनेत्याची ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्ताने खास पोस्ट, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाला, “या माणसाने…”

दरम्यान, २९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. यावेळी सिद्धू अवघ्या २८ वर्षांचा होता. त्याने आपल्या कामाने देशभरात नाही तर जगभरात नाव कमावलं होतं. तरुणाई तर त्यांच्या गाण्यांची अक्षरशः वेडी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिष्णोई यांनी स्वीकारली होती. दिल्ली पोलीस दावा करत म्हटले होते की, हत्येपूर्वी ७ मारेकऱ्यांनी १५ दिवसांत ८ वेळा सिद्धू मुसेवालाचं घर, गाडी आणि रस्त्याची रेकी केली होती. पण ८ वेळा सिद्धूची हत्या करण शक्य झालं नाही. कारण तो बुलेट प्रूफ गाडी आणि कमांडसह करत असे.