नव्वदीच्या दशकामध्ये ‘आशिकी’ या चित्रपटाची गाणी खूप गाजली. पुढे २०१३ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. ‘आशिकी २’ च्या गाण्यांमुळे अरिजीत सिंह या नवोदित गायकाला खूप प्रसिद्धी मिळाली. जीत गांगुली, मिथुन आणि अंकित तिवारी यांनी मिळून या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते. या चित्रपटामध्ये अंकितने गायलेल्या ‘सून रहा है ना तू’ या गाण्याला फार लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याच्या ‘गलीया’ या गाण्यालाही लोकांना चांगला प्रतिसाद दिला.

अंकित तिवारी हा बॉलिवूडमधल्या आघाडीच्या संगीतकारांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अंकितचा एक चाहता त्याला भेटायला आला होता. तो अंकितच्या घराखाली त्याच्या येण्याची वाट पाहत होता. पुढे त्या चाहत्याने त्याला भेटायचा प्रयत्न करतो. पण बाजूला असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्या चाहत्याला ओढत बाहेर काढत असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – राजामौलींच्या चित्रपटात दीपिका पदुकोणची वर्णी? महेश बाबूसह पडद्यावर रोमान्स करणार असल्याच्या चर्चांना उधाण

त्यानंतर अंकित सुरक्षा रक्षकाला त्या चाहत्यासह नरमाईने वागायला सांगतो. त्याचं बोलणं ऐकत असलेल्या सुरक्षा रक्षकांची नकळत पकड सैल पडते. याचा फायदा घेत तो चाहता अंकितकडे धावत जातो आणि त्याच्या पाया पडतो. पुढे अंकित ‘माझ्या पायांना नमस्कार करु नका’ असे म्हणत त्याला मिठी मारतो. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी अंकितचे कौतुक केले आहे, तर काहीजणांनी सुरक्षा रक्षकाच्या वर्तनावर टीका केली आहे.

आणखी वाचा – विवेक अग्निहोत्रींनी केलं बॉलिवूड पुरस्कारांवर टीका करणारं ट्वीट; हा रणवीर सिंगला टोला असल्याची चर्चा

२०१४ मध्ये अंकित तिवारी चर्चेत आला होता. तेव्हा त्याच्या कथित प्रेयसीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण प्रचंड गाजले होते. त्यानंतर आरोपांमुळे त्याला अटक देखील झाली होती. २०१७ मध्ये न्यायालयाद्वारे त्याची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली.