Sitare Zameen Par Public Review : अभिनेता आमिर खानचा बहुप्रतिक्षीत ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आज (२० जून रोजी) जगभरात प्रदर्शित झाला आहे. ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल असलेल्या या चित्रपटात आमिर खान व जिनिलीया देशमुख यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट कसा आहे, तो पाहावा की नाही, याबद्दल प्रेक्षकांनी एक्सवर पोस्ट केल्या आहेत.

‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात एका निलंबित बास्केटबॉल कोचची गोष्ट दाखवण्यात आली आहे. कोचच्या भूमिकेत आमिर खा नआहे. कोचला डीयूआयच्या घटनेनंतर दिव्यांग मुलांच्या संघाला प्रशिक्षण देण्याचा आदेश कोर्टाकडून दिला जातो. त्या मुलांना बास्केटबॉल शिकवताना कोचला तारेवरची कसरत करावी लागती. यानंतर त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर व जिनिलिया देशमुखबरोबरच आरोश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे कलाकार आहेत.

पाहा प्रेक्षकांच्या पोस्ट

सितारे जमीन पर थिएटरमध्ये पाहणं चुकवून मग म्हणू नका की बॉलीवूडमध्ये चांगले चित्रपट बनत नाहीत, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.

हा चित्रपट भावनिक, दमदार आणि खूपच खास आहे, असं एका युजरने लिहिलं आहे.

सितारे जमीन पर हा एक गोड आणि चांगल्या हेतूने बनवलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये भरपूर हास्य आणि भावनिक क्षणही आहेत, असं एका युजरने लिहिलं आहे.

निराशाजनक!

हा चित्रपट कंटाळवाणा आहे. यात गोंधळात टाकणारे संवाद आहेत आणि व्हॉट्सअॅपवरील विनोद वापरले आहे. हा चित्रपट डिझास्टर आहे, अशी पोस्ट एका युजरने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर खानच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन किती असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.