केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘क्यूं की सास भी कभी बहू थी’ या हिट मालिकेतील तुलसीच्या भूमिकेसाठी विशेष ओळखलं जातं. आता त्या राजकारणात सक्रिय असल्या तरी मनोरंजनसृष्टीत त्यांचे अनेक मित्र आहेत. अलीकडेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण करून स्मृती इराणी खूप रडल्या. सुशांतच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती हेही सांगितलं. सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी ताबडतोब अभिनेता अमित साधला फोन केला होता. अमित साध आणि सुशांत सिंह खूप चांगले मित्र होते.

“घरगुती हिंसाचार, घटस्फोट, दुसरं लग्न अन्…”, आता प्रसिद्ध अभिनेत्रीला व्हायचंय आई; म्हणाली, “बाळ दत्तक…”

नीलेश मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी यांनी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झालेला दिवस आठवला. त्याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. स्मृती इराणी म्हणाल्या, “ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला, तेव्हा मी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होते, खूप लोक होते, मी काही करू शकत नव्हते, मला वाटलं की त्याने मला फोन का केला नाही. त्याने मला लगेच फोन करायला हवा होता. मी त्याला म्हटलं होतं की कधी स्वतःचा जीव घेऊ नकोस,” असं म्हणताना स्मृती इराणींना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

सोनाली बेंद्रेवर जडलेला पाकिस्तानी क्रिकेटपटूचा जीव; पाकिटात ठेवायचा फोटो, म्हणालेला “तिने नकार दिल्यास…”

त्या म्हणाल्या, “मी अमित साधला फोन केला होता. सुशांतच्या घटनेनंतर मी घाबरले होते की अमितही असं काही करेल. हाही काहितरी चुकीचं करेल, अशी मला शंका होती. मी त्याच्याशी सहा तास बोलत होते, त्याने मला विचारलं होतं की तुम्हाला काही काम नाही का, तरीही मी त्याला म्हटलं की मला काम आहे, पण तू बोल,” अशी आठवणही त्यांनी सांगितली.

“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मृती यांनी सांगितले की, त्यांनी सुशांतला काम करताना पाहिलं आहे. त्यांनी एकदा सुशांतला इफ्फीसाठीही बोलावले होते. सुशांत सिंगच्या निधनानंतर स्मृती यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये “माझ्याकडे शब्द नाहीत, तू काय केलेस ते मला समजत नाही…” असं लिहिलं होतं.