चार वर्षं रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या शाहरुख खानने २०२३ मध्ये सलग ३ ब्लॉकबस्टर चित्रपट देत बॉक्स ऑफिसचा किंग तोच आहे हे पुन्हा सिद्ध केलं. दिल्लीवरून एका सामान्य कुटुंबातून मुंबईत अभिनयात करियर करण्यासाठी आलेल्या या मुलाने आज जगभरात त्याचं आणि भारताचं नाव मोठं केलं आहे. शाहरुखने आजवर बऱ्याच सुपरहीट चित्रपटात काम केलं आहे. खलनायक ते रोमान्स किंग ते अॅक्शन स्टार असा हा शाहरुखचा प्रवास भन्नाटच आहे.

शाहरुखने ‘दीवाना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण तो त्याचा पहिला चित्रपट नव्हता. ‘दिवाना’च्याही आधी शाहरुखने ‘राजू बन गया जेंटलमन’ आणि ‘कभी हां कभी ना’ या दोन चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. काही कारणास्तव हे चित्रपट प्रदर्शित व्हायला वेळ लागला अन् त्याआधीच ‘दीवाना’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटांपैकी ‘कभी हां कभी ना’ हा चित्रपट शाहरुखचाही अत्यंत आवडता आणि जवळचा आहे. खुद्द शाहरुखनेच एका मुलाखतीमध्ये याबद्दल स्पष्ट केले आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचे हक्कदेखील शाहरुखनेच विकत घेतले आहेत.

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
sharad ponkshe reacts on Swatantra Veer Savarkar movie
शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”
Deepshikha Nagpal career
सलमान खान, शाहरुख खानचे चित्रपट नाकारले, वैयक्तिक आयुष्यातही आलं अपयश; दोन घटस्फोटांनंतर ‘ही’ अभिनेत्री आता…

आणखी वाचा : श्वेता तिवारीच्या गोवा वेकेशनचे फोटो व्हायरल; शॉर्ट्समध्ये अभिनेत्रीला पाहून चाहत्यांची उडाली झोप

कुंदन शाह दिग्दर्शित या चित्रपटाची तिकीट त्यावेळी खुद्द शाहरुखने बॉक्स ऑफिसवर उभं राहून विकली होती. या चित्रपटाला काल म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या अत्यंत जवळचा आहे. यातील गाणी, कथानक आणि शाहरुखचं सुनील हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. नुकतंच या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सूचित्रा कृष्णमूर्ती यांनी या चित्रपटाच्या काही आठवणी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्या आहेत. इतकंच नव्हे तर एका मुलाखतीदरम्यान सूचित्रा यांनी ‘कभी हां कभी ना’ च्या रिमेकमध्ये कुणाला पाहायला आवडेल याचाही खुलासा केला आहे.

‘झूम’शी संवाद साधताना सूचित्रा म्हणाल्या, “या चित्रपटाचा रिमेक झाला तर यातील सुनील आणि अॅना ही पात्रं कोण उत्तम साकारेल? हा प्रश्न मला गेली कित्येक वर्षे विचारला जात आहे. या चित्रपटातील या दोन भूमिकांमध्ये मला वरुण धवन आणि आलिया भट्ट यांना पाहायला आवडेल, पण आता तेदेखील या भूमिकांच्या मानाने बरेच मोठे आणि प्रगल्भ झाले आहेत. ही भूमिका साकारण्यासाठीएखादा तरुण कलाकार हवा. कदाचित कावेरी ही माझी भूमिका साकारू शकेल, अन् शाहरुखचं सुनील हे पात्र आर्यन खान उत्तमरित्या साकारू शकतो, पण त्याला अभिनयात रस नाही असं मी ऐकलं आहे.”

‘कभी हां कभी ना’मधील काही फोटोज आणि आठवणी शेअर करत सूचित्रा आपल्या पोस्टमध्ये लिहितात. “यावर्षीच्या २५ फेब्रुवारीला आमच्या चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाली. माझा हीरो हा आजही एक रॉकस्टार आहे जो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच मी अभिनयातून कायमचा ब्रेक घेतला होता, अन् मला त्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. परंतु आमच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं आहे हे मला गेल्या काही वर्षांतच समजलं आहे. आमचा चित्रपट हा ‘आयएमडीबी’च्या २०२४च्या आयकॉनीक रोमॅंटिक चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे याबद्दल मला नुकतंच कुणीतरी सांगितलं आहे. माझ्याकडे याविषयी बोलण्यासाठी शब्दच नाहीयेत, ही परमेश्वराचीच कृपा आहे.”