मुकेश छाबरा हा बॉलीवूडमधील दिग्गज कास्टिंग डायरेक्टर आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांसाठी कलाकारांची निवड केली आहे. पण त्याच्या या यशात सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) मोठा वाटा आहे. खुद्द मुकेशने याबाबत सांगितलं आहे. सुनीलने मुकेशला त्याचं ऑफिस सुरू करण्यासाठी मदत केली होती, असा खुलासा त्याने केला आहे.

यूट्यूब चॅनल भारती टीव्हीवरील पॉडकास्टमध्ये मुकेशने सुनील शेट्टीने कशी मदत केली ते सांगितलं आहे. “जेव्हा मी कास्टिंग डायरेक्टर म्हणून नावारुपाला येऊ लागलो, तेव्हा मुंबईतील सर्वात चांगल्या लोकांपैकी एक असलेल्या सुनील शेट्टीचा आराम नगरमध्ये १६० नावाचा एक बंगला होता. त्यावेळी मी त्याची मुलगी अथिया शेट्टीबरोबर ‘हिरो’ चित्रपट करत होतो. तेव्हा तो मला म्हणाला, ‘तू एवढ्या छोट्या ऑफिसमध्ये का काम करतोस, माझा आराम नगर येथील बंगला घे.’ मी म्हटलं की माझ्यावर खूप दबाव आहे. तर तो म्हणाला, ‘काळजी करू नको, फक्त चांगले काम करत राहा.’ तो माणूस जी चांगली कामं करतो त्याबद्दल कोणालाही सांगत नाही. एवढा मोठा बंगला त्याने मला आराम नगरमध्ये दिला. तो म्हणाला, ‘भाड्याची काळजी करू नकोस. तू माझ्या मुलीसाठी खूप काही केलं आहेस, हा बंगला घे’,” अशी आठवण मुकेशने सांगितली.

सोनाक्षी सिन्हाबद्दल पहिल्यांदाच सासूबाई म्हणाल्या, “तू आमची सून आहेस हे…”

पुढे मुकेश म्हणाला, “मी त्या बंगल्यात माझे काम सुरू केले, नवीन ऑफिस सजवले, नवीन लोगो तयार केला आणि ऑफिसचे उद्घाटन केले. या उद्घाटनाला राजकुमार रावसारखे बरेच कलाकार आले होते. मी माझ्या जवळच्या मित्रांबरोबर काम केले आणि कंपनी उभारली. हळूहळू आम्ही यशस्वी होत गेलो आणि आता आम्ही या टप्प्यावर पोहोचलो आहोत की आमचे ऑफिसेस चंदीगड, दिल्ली आणि लंडनमध्ये आहेत.

“अंबानींच्या लग्नावर टीका करणारे तुम्ही कोण?” पाकिस्तानींना त्यांच्याच अभिनेत्याने सुनावलं; म्हणाला, “त्यांच्या पैशांवर…”

अथिया शेट्टीचा पहिला चित्रपट

अथियाने २०१५ मध्ये निखिल अडवाणीच्या ‘हिरो’मधून आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती ‘मुबारकां’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Athiya shetty
सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (फोटो – इन्स्टाग्राम)

मुकेश छाबरा यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने ‘दंगल’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ सारख्या कलाकृतींसाठी कास्टिंगचं काम केलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं.