बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा कायमच चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनय आणि स्टंटबाजीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केले. बॉलिवूडचा अण्णा म्हणून त्याला ओळखले जाते. सुनील शेट्टीने अॅक्शन हीरो म्हणूनच बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि पुढेही त्याची हीच ओळख कायम राहिली, पण सुनील शेट्टीच्या याच पदार्पणावर बऱ्याच लोकांनी टीकादेखील केली होती.

आता रणवीर ब्रारच्या शोमध्ये नुकतंच सुनील शेट्टी आणि संजय दत्त हजेरी लावणार आहेत. नुकताच याचा टीझरही समोर आला. यादरम्यान सुनील शेट्टीने संजय दत्तबरोबरच्या बऱ्याच आठवणी शेयर केल्या. तसेच दोघांनी मैत्री कशी टिकवून ठेवली याबद्दलही भाष्य केलं. याचसंदर्भात ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

आणखी वाचा : “हे गाणं सोनू निगमच गाणार…” जेव्हा ‘पीके’ चित्रपटाचे निर्माते अडून राहिले, गायकाने सांगितला अनुभव

सुनील शेट्टीने चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांवरही भाष्य केलं. सुनील शेट्टी म्हणाला, “सध्या चित्रपटसृष्टीचा स्वतःचा असा आवाज राहिलेलाच नाही. कुणी एखाद्यावर बोट ठेवलं तर कुणीच त्याच्या बाजूने एकत्र उभे राहत नाहीत. चित्रपटसृष्टीतील एकी हरवली आहे. सगळेच कमकुवत झाले आहेत. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आता परिस्थिती बदलत आहे, या वेगवेगळ्या हॅशटॅग्स व बॉयकॉटच्या दलदलीतून इंडस्ट्री बाहेर येत आहे, आता लोक एकमेकांसाठी झगडताना दिसत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बलवान’ या चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हापासून हा बॉलिवूडचा अण्णा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सुनील शेट्टी अभिनयाबरोबरच इतरही व्यवसायात निपुण आहे. लवकरच तो अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्याबरोबर ‘हेरा फेरी ४’मध्ये झळकणार आहे.