Sunita Ahuja To Judge Farah Khan’s New Show : दिग्दर्शिका फराह खान तिच्या युट्यूब चॅनेलमुळे अनेकदा चर्चेत असते. तिचा कुक दिलीपबरोबरचे तिचे ब्लॉग हल्ली खूप चर्चेत असतात. अशातच आता ती लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवीन कार्यक्रम घेऊन येणार आहे.

फराह खान सुरू करत असलेल्या कार्यक्रमात लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांच्या पत्नी पाहायला मिळणार आहेत. याबाबत फराहने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्याबरोबर तिचा भाऊ साजिद खान व सुनिता आहुजा पाहायला मिळत आहे.

फराह खानच्या ‘या’ कार्यक्रमात झळकणार सुनीता आहुजा

सुनीता आहुजा फराह खानच्या ‘आंटी किसको बोला’ या आगामी कार्यक्रमातून झळकणार आहेत. नुकतच फराह खानने इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. फराह खान ‘आंटी किसको बोला’ हा नवीन कार्यक्रम घेऊन आली आहे. त्यासंबंधित सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तिचा भाऊ साजिद खान व सुनीता यांचं स्वागत करताना दिसतेय.

‘फराह खानने आज २८ ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून, त्याला तिनं “उद्यापासून माझा नवीन कार्यक्रम ‘आंटी किसको बोला’ माझ्या चॅनेलवर सुरू होत आहे.” अशी कॅप्शन दिली आहे. त्यामध्ये पुढे तिने सुनीता व साजिद यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, “सुनीता व साजिद तुम्ही माझ्या कार्यक्रमाचे परीक्षक झालात, त्याबद्दल धन्यवाद” आणि त्यामध्ये एक खास व्यक्ती देखील पाहायला मिळणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.

‘आंटी किसको बोला’ या कार्यक्रमात सुनीता आहुजा साजिद खानबरोबर परीक्षक म्हणून असणार आहेत. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळे परीक्षक परीक्षण करताना दिसणार आहेत. फराह खान सुरू करत असलेला हा नवीन कार्यक्रम नक्की कसा असेल हे पाहणं रंजक ठरेल.

फराह खानने आजवर अनेक गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. अनेक दिग्गज कलाकारांना तिनं नृत्य शिकवलं आहे. त्यासह ती एक चित्रपट दिग्दर्शकसुद्धा आहे. हल्ली ती तिच्या फराह खान या यूट्यूब चॅनेलमुळे विशेष चर्चेत असते. त्यावर ती अनेक कलाकारांच्या भेटी घेत त्यांच्यासह वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसते.