Sunjay Kapur’s wife Priya Sachdev changes name: करीश्मा कपूरचा एक्स पती उद्योगपती संजय कपूरचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. १९ जून रोजी दिल्लीच्या लोधी मार्ग येथे त्यांच्यावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संजय कपूरच्या मृत्यूनंतर आता त्याच्या संपत्तीबद्दल वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रिया सचदेवने घेतला ‘हा’ निर्णय
काही दिवसांपूर्वी संजय कपूरच्या आईने कंपनीच्या वार्षिक मिटिंगपूर्वी संचालक मंडळाला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी आरोप केला होता की त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. तसेच काही व्यक्ती कुटुंबाचा वारसा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी कुणाचीही नियुक्ती केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रात त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, या पत्राचा रोख संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेवकडे असल्याचे म्हटले जात होते.
प्रिया सचदेवला दोन मुले आहेत. प्रिया आणि संजय कपूर यांना एक मुलगा आहे, तर संजय कपूरबरोबर लग्न करण्याआधी तिचे आधी एक लग्न झाले होते. विक्रम चटवाल यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव सफिरा असे आहे. सफिरा तिच्या आईबरोबर राहते.
आता सोना कॉमस्टार या ऑटो कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग फर्ममध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रिया सचदेवने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही बदल केले आहेत. पूर्वी तिच्या अकाउंटवर प्रिया सचदेव कपूर असे नाव तिने लिहिले होते, तर आता प्रिया संजय कपूर असे लिहिल्याचे दिसत आहेत. तसेच सोना कॉमस्टर कंपनीची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असल्याचेदेखील तिने नमूद केले आहे. याबरोबरच संजय कपूरचे ध्येय ती पुढे नेत असल्याचेदेखील इन्स्टाग्रामवर लिहिल्याचे दिसत आहे.

इतकेच नाही तर प्रियाची मुलगी सफिरा याआधी तिच्या वडिलांचे नाव म्हणजेच विक्रम चटवाल यांचे नाव तिच्या नावापुढे लिहित होती. मात्र, आता तिने तिचे आडनाव हटवले असून फक्त तिचेच नाव तिच्या अकाउंटवर दिसत आहे.
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला मनोरंजन क्षेत्रात मॉडेल म्हणून काम केल्यानंतर प्रियाने नील ‘एन’ निक्की या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली. २०११ मध्ये विक्रम चटवालबरोबर तिचा घटस्फोट झाला. २०१७ मध्ये अभिनेत्री करीश्मा कपूरपासून वेगळे झाल्यानंतर संजय कपूर व प्रिया सचदेवने लग्नगाठ बांधली. संजय आणि करीश्मा कपूर यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत.
२०१५ साली संजय कपूरचे वडील सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर सोना कॉमस्टार या कंपनीची धुरा त्यांच्या हातात आली. कंपनीला नवी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ब्लूमबर्गच्या मते, सोना कॉमस्टार कंपनीचे बाजारमूल्य तब्बल ३१ हजार कोटी (४ अब्ज डॉलर्स) इतके आहे.