अभिनेता सनी देओल आज त्याचा ६४वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट देणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये सनीचं नाव टॉपला आहे. त्याने आजवर बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. तसेच प्रत्येक अभिनेत्रीबरोबर त्याची चांगली मैत्री होती. काही अभिनेत्रींशी त्यांच नावही जोडलं गेल. एका पत्रकार परिषदेदरम्यान तर अभिनेत्री प्रिती झिंटाने त्याला सगळ्यांसमोर किस केलं होतं. या प्रकरणाची आजही चर्चा रंगताना दिसते.

२०१८मधील हा प्रकार आहे. ‘भैय्याजी सुपरहीट’ चित्रपटामध्ये सनी-प्रितीने एकत्र काम केलं. नोव्हेंबर २०१८मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्यानिमित्ताने बऱ्याच वर्षानंतर रुपेरी पडद्यावर हे दोघं एकत्र काम करताना दिसले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

या पत्रकार परिषदेदरम्यान सनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होता. याचदरम्यान प्रितीने अचानक त्याला आधी पाठीवर किस केलं. नंतर त्याच्या गालावर किस केलं. प्रितीने किस केल्यानंतर सनीने तिच्याकडे पाहिलं आणि तिथे तो हसू लागला. तेव्हा प्रितीने सनीबाबत एक वक्तव्य केलं होतं.

आणखी वाचा – वडिलांना देव मानणारा सनी देओल सावत्र बहिणीचं तोंडही पाहणं पसंत करत नाही, कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सनी व माझे जवळचे संबंध असल्याचं प्रितीने यावेळी सांगितलं होतं. तसेच माझा आवडता सहकलाकार सनी देओल असल्याचंही प्रिती म्हणाली. तसेच देओल कुटुंबीयांशीही प्रितीचे चांगले संबंध आहेत. पण प्रितीने भर कार्यक्रमामध्ये सनीला किस केल्यानंतर या प्रकरणाची सगळीकडे चर्चा रंगली होती.