सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. गदर २ च्या यशानंतर अभिनेता सनी देओलने आपल्या मानधनात वाढ केल्याची चर्चा सुरु आहे. चित्रपट समीक्षक व अभिनेता कमाल राशिद खानने याबाबत ट्वीटही केलं आहे.
हेही वाचा- धर्मेंद्र यांच्याप्रमाणेच हेमा मालिनीही चित्रपटात करणार किसिंग सीन; खुलासा करत म्हणाल्या…
२२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर एक प्रेम कथा’चा हा सिक्वल आहे. त्याकाळी गदर एक प्रेम कथा’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाचाही रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सनी देओलने आपल्या फीमध्ये वाढ केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- ‘ड्रीम गर्ल २’ पुढे ‘गदर २’ची जादू फिकी, आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…
केआरकेने ट्विट करत लिहिलं आहे ‘एका निर्मात्याने सनी देओलची भेट घेतली आणि त्याला चित्रपट साइन करण्यास सांगितले, सनीने त्याला ५० कोटी फी मागितली.’ केआरकेच्या या ट्वीटवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
गदर २ च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ४३० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने ५०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. सनी देओलशिवाय या चित्रपटात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.