अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या ‘गदर २’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘गदर २’ हा चित्रपट २००१ मध्ये रिलीज झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. सध्या सनी देओल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने बॉलीवूडमध्ये गेल्या दहा वर्षांत झालेल्या बदलांविषयी भाष्य केले.

हेही वाचा : Friendship Day : जुई गडकरीसह ‘ठरलं तर मग’ मालिकेतील महिला कलाकार गेल्या ट्रिपला, नेटकरी म्हणाले, “अरे वा! सासू बाई आणि…”

सनी देओल ‘आज तकला’ दिलेल्या मुलाखतीत अलीकडचे अभिनेते अंगावरचे केस काढतात (बॉडी शेव्ह) हे मला पटत नाही याबाबत सांगताना म्हणाला, “आताचे अभिनेते सहज अंगावरचे केस काढतात, मला स्वत:ला याची खूप लाज वाटते. मी मुलींप्रमाणे दिसू लागलो असे वाटते. आपण अभिनेते आहोत…बॉडी बिल्डर्स नाही याची जाणीव मला आहे. बॉलीवूडध्ये आपण अभिनय करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतो त्यामुळे बॉडीची काय आवश्यकता आहे? मला हे पटत नाही. सिक्सपॅक्स ॲब्स बनवण्यासाठी मी कधीच उत्सुक नव्हतो. बॉलीवूडमध्ये येण्यासाठी डान्स येणे आणि बॉडी असणे आवश्यक असते असा काही लोकांचा गैरसमज आहे.”

हेही वाचा : “तुझा अभिमान…”, अभिज्ञा भावेने ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, क्षिती जोगचे कौतुक करत म्हणाली…

सनी देओल पुढे म्हणाला, “निर्मात्यांमुळे हा बदल बॉलीवूडमध्ये झाला आहे. त्यांना अशाच गोष्टी करणारे अभिनेते आवडतात, अगदी आजकालच्या चित्रपटांच्या कथाही तशाच असतात. स्वत:चे चित्रपट, कथा तयार करण्यापेक्षा काही निर्मात्यांना वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून आयत्या कथा घ्यायला आवडतात.”

हेही वाचा : Friendship Day : “आयुष्यातील हीच ती लोकं…”, मैत्री दिवसाच्या निमित्ताने केदार शिंदेनी शेअर केला खास फोटो; म्हणाले, “यांना ओळखलंत का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेता सनी देओलचा ‘गदर २’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अमीषा पटेल आणि सनी देओल यांची जोडी तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे.