सनी देओलचा गदर २ चित्रपट सुपरहिट ठरला आहे. चित्रपटाची स्टारकास्ट या यशाचा आनंद साजरा करत आहेत, अशातच सनी देओल व त्याच्या दोन कथित एक्स गर्लफ्रेंड्सबरोबर दिसला. सनी देओल व अमृता सिंह हे दोघेही डिंपल कपाडियांच्या घराबाहेर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात हे तिघेही एकत्र एकाच चित्रपटात दिसणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

२० वर्षांचा संसार, एकेदिवशी अभिनेत्याला कळालं की त्याची पत्नी दुसऱ्याची बायको आहे अन्… ‘आशिकी’ स्टारची झालेली फसवणूक

अमृता सनी देओलची एक्स गर्लफ्रेंड आहे, तर सनीचे नाव एकेकाळी डिंपल कपाडियांशी जोडले गेले होते. त्यावेळी डिंपल राजेश खन्नांपासून वेगळ्या राहत होत्या. सनी देओलच त्यांच्या दुराव्याला कारणीभूत होता, असे दावेही अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याकाळी केले जात होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. दुसरीकडे सनी व अमृताला लग्न करायचं होतं, पण दोघांच्याही आईंनी लग्नाला विरोध केला होता.

रवींद्र महाजनींचा मृत्यू कशामुळे झाला? लेक गश्मीरने केला खुलासा; म्हणाला, “डॉक्टरांनी सांगितलं की…”

दरम्यान, आता बऱ्याच वर्षांनी सनी, डिंपल व अमृता एकत्र दिसले आहेत. सनी डिंपल कपाडियांच्या बिल्डिंगमधून बाहेर पडताच कारमध्ये बसला, तर अमृता सिंह आणि डिंपल एकाच कारमध्ये जाताना दिसले. यादरम्यान पापाराझींनी त्याला क्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते घाईत होते. डिंपल यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सनी देओल जुहू पीव्हीआरच्या बाहेर दिसला. तर नंतर डिंपलदेखील तिथेच दिसल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओल आणि डिंपल कपाडिया ८० च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी ‘आग को गोला’, ‘मंझिल मंझिल’ आणि ‘नरसिंहा’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. असं म्हटलं जातं की दोघेही एकमेकांना ११ वर्षे डेट करत होते. दुसरीकडे अमृताने सनीला डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं होतं.