बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या चर्चेत आहे. रिया ‘एमटीव्हीवरील रोडीज’ या रिएलिटी शोच्या नव्या पर्वात गँगलीडर म्हणून दिसणार आहे. ‘एमटीव्ही रोडीज’च्या १९व्या पर्वाचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमो व्हिडीओमध्ये रिया चक्रवर्तीची ओळख गँगलीडर म्हणून करुन देण्यात आली.

एमटीव्ही रोडीजच्या या प्रोमो व्हिडीओमध्ये रिया दमदार अँक्शन करताना दिसली होती. याबरोबरच “तुम्हाला काय वाटलं…मी परत नाही येणार?…मी घाबरले?…आता घाबरण्याची वेळ दुसऱ्यांची आहे,” असंही रियाने व्हिडीओत म्हटलं होतं. रियाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या होत्या. एमटीव्ही रोडीजच्या या व्हिडीओनंतर आता सुशांत सिंह राजपुतच्या बहिणीने केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा>> Video: केक कापला, मिठी मारली, किस केलं अन्…; अंकिता लोखंडेचा पतीबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सुशांतच्या बहिणीने ट्वीट करत “तू का घाबरशील? तू तर वेश्या होतीस, आहेस आणि राहशील. प्रश्न हा आहे की तुझे उपभोगता कोण आहेत? कोणीतरी सत्ताधारीच अशी हिंमत दाखवू शकतो. सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये होणाऱ्या विलंबासाठी कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट झालं आहे,” असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. सुशांतच्या बहिणीचं हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> उर्फी जावेदबाबत महिला नेत्याची प्रतिक्रिया, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तिचे कपडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन वर्षांपूर्वी १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईत आत्महत्या करत जीवन संपवलं. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.