आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांना करोना, इन्फ्लूएंझा, डीप न्यूमोनियाची लागण झाली आहे. १३ जानेवारी रोजी, ललित यांनी सोशल मीडियावर त्यांना दोन आठवड्यात इन्फ्लूएंझा आणि न्यूमोनियासह दोन वेळा करोना झाल्याची माहिती दिली होती. दरम्यान, ललित मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी सुश्मिता सेनबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. अशातच सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने ललित मोदींना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ललित मोदी यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं की, “मी मेक्सिकोमध्ये होतो, तिथे ते आजारी पडलो आणि आता एअर अॅम्ब्युलन्सने लंडनला गेलो आहे. शेवटी दोन डॉक्टर आणि सुपरस्टार सुपर कुशल मुलासह एअर अॅम्ब्युलन्सद्वारे लंडनला पोहोचलो. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. दुर्दैवाने मी अजूनही २४ तास ऑक्सिजनवर आहे. “ललित यांच्या पोस्टवर राजीव सेनने त्यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. “ललित, तुम्ही लवकर बरे व्हावे, यासाठी शुभेच्छा देतो, स्ट्राँग राहा,” अशी कमेंट राजीवने केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जुलै २०२२ मध्ये ललित मोदींनी सुश्मिता सेनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते आणि आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. पण सुश्मिता सेनने कधीही ललित मोदींसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली नाही. काही काळाने ललित मोदी यांनी ते फोटो डिलीट केले होते.