अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुप्रतिक्षीत ‘विक्रम वेधा’ चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. २०१७ साली आलेल्या दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट मूळ चित्रपटापेक्षाही चांगला असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत. दरम्यान, या बहुचर्चित सिनेमातील मुख्य अभिनेता हृतिक रोशन याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत.

Vikram Vedha Movie Review : रिमेक असूनही उत्तम अभिनयाची जोड असलेला ‘विक्रम वेधा’

सुझान खानने हा चित्रपट तिचा आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आवडता चित्रपट असल्याचं म्हटलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “रा रा रा रा रूम, हा माझ्या आतापर्यंतच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे!!! हा अतिशय रंजक आणि साहसी चित्रपट आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खान आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.”

सबा आझादने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये चित्रपटाचा टीझर शेअर केलाय. ‘विक्रम वेधा चित्रपट रिलीज झालाय. तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो पाहू शकता.’ याबरोबरच तिने चित्रपटाचे तिकीट बुक करण्यासाठी लिंक देखील शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
saba azad
(सबा आझादने शेअर केलेली स्टोरी- फोटो इन्स्टाग्रामवरून स्क्रीनशॉट)

दरम्यान, हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान यांनी चित्रपटाबद्दल दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत. ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस. शशिकांत आणि रिलायन्स एन्टरटेन्मेंट यांनी निर्मिती केली आहे.