बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती अनेक राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर तिचं मत मांडत असते. गेल्या काही दिवसांपासून स्वरा तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. तिने नुकतेच समाजवादी पक्षाचे नेता फहाद अहमदशी लग्न केलं आहे.

“तिला १००० पुरुषांबरोबर…” अयोध्येच्या महंतांची स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या लग्नावर टीका

लग्नामुळे स्वरा भास्कर खूप चर्चेत आहे. बरेच जण तिच्या लग्नाची तुलना श्रद्धा वालकर प्रकरणाशी करत आहेत. तसेच सूटकेस, फ्रिज, धर्मांतर या शब्दांचा वापर करून तिला ट्रोल केलं जातंय. यावर स्वराने मौन सोडलं आहे. तिने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर करत तिच्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. द्वेष करणारे सुटकेस, फ्रीज, बेकायदेशीर, धर्मांतर अशा विषयांवर बोलत राहतील, पण आम्ही मात्र खूश आहोत, अशा आशयाचं ट्वीट तिने केलं आहे.

याबरोबरच स्वराने तिच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती, फहाद व त्या दोघांचे कुटुंब खूप खूश दिसत आहेत. एका फोटोत फहाद स्वराची आई इरा भास्करला मिठी मारतानाही दिसत आहे. तर एका फोटोमध्ये फहाद आणि स्वरा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, फहाद आणि स्वराने जानेवारी महिन्यात नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर मार्च महिन्यात ते दिल्लीत लग्न करणार आहेत.