बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चांगलीत चर्चेत आली आहे. स्वराने ६ जानेवारीला समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केलं. फेब्रुवारी महिन्यात स्वराने फहादबरोबरचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न केल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली होती. स्वराच्या या पोस्टमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पती फहादबरोबरचे रिसेप्शन सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. मात्र, या फोटोवरुन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्यापेक्षा चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणत ट्रोल केलं जात आहे. पण यामागे नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया.

हेही वाचा- ऐश्वर्या राय बच्चनचा ‘तो’ जुना व्हिडिओ व्हायरल; नेपोटीजम अन् आलिया भट्टबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली

स्वरा भास्करने तिच्या लग्नात मनीष मल्होत्रा, सब्यसाची सारख्या मोठ्या भारतीय डिझायनर्सना सोडून पाकिस्तानी डिझायनर अली झीशानचा लेहेंगा परिधान केला होता. स्वरा भास्कर तिच्या रिसेप्शनच्या लेहेंग्यात सुंदर दिसत होती. स्वराने पाकिस्तानी डिझायनरचा क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. लेहेंग्यावर पाकिस्तानी एम्ब्रॉयडरी केलेली होती. पण चाहत्यांना तिचा लेंहंगा बनवणारा पाकिस्तानी डिझायनर आवडला नाही. स्वत: स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या डिझायनरला टॅग करत तिच्या रिसेप्शन लूकचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. स्वराने तिच्या रिसेप्शनचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करताना अभिनेत्रीने “हा लेहेंगा खूप सुंदर बनवला आहे. सीमेपलीकडून माझ्याकडे पाठवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझ्यासाठी हा सुंदर लेहेंगा बनवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार,” असं लिहिलं होतं. @natrani नावाच्या व्यक्तीमुळे हे शक्य झाल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा- “गुडबाय मित्रा, जा तुला माफ केलं”; सतीश कौशिक यांच्या आठवणीत अनुपम खेर भावूक, शेअर केला VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
रिसेप्शनमध्ये परिधान केलेल्या पाकिस्तानी लेहेंग्यामुळे स्वरा भास्कर ट्रोल

लेहेंग्यामुळे स्वरा ट्रोल

स्वरा भास्करचा रिसेप्सनचा फोटो पाहून लोकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने तिला घाघरा-ए-मुमताज म्हणलं आहे. तर एकाचे स्वराचे ‘पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे’, अशी कमेंट केली आहे. यासोबतच एका युजरने त्याला टॅग केले आणि लिहिले की ही राष्ट्रीय लाजिरवाणी आहे. एका यूजरने तिला तुकडे-तुकडे गँगचा भाग म्हटले आहे. कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वरा भास्करच्या नावावर अशा कमेंट्सचा वर्षाव सातत्याने होत आहे.