बॉलीवूडमध्ये सध्या एका नवी जोडीची खूप चर्चा आहे. अभिनेत्री तारा सुतारिया महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाला डेट करतेय, असं त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हटलं जातंय. सोशल मीडियावर दोघांनी फोटोवर कमेंट्स केल्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलंय.

तारा सुतारिया अभिनेता रणबीर कपूरच्या आत्याचा मुलगा आदर जैनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण तीन वर्षांनी हे दोघे वेगळे झाले. त्यानंतर आदरने त्याची मैत्री अलेखा अडवाणीशी लग्नगाठ बांधली. आता तारा ‘स्काय फोर्स’ फेम वीर पहारियाला डेट करत आहे, असं म्हटलं जातंय.

तारा सुतारिया व वीर पहारिया बॉलीवूडमधील चर्चेतलं कपल आहे. तारा व वीर काही दिवसांपूर्वी डिनर डेटवर गेले होते. त्यानंतर आता त्यांचा नवा व्हिडीओ चर्चेत आहे. ताराने ह्युंदाई इंडिया कॉउचर वीकमध्ये रॅम्पवॉक केला. यावेळी वीर प्रेक्षकांमध्ये बसला होता. त्यानंतर ताराने सर्वांकडे पाहून हात उंचावले आणि वीरला फ्लाईंग किस दिली. त्यावर वीरनेही प्रतिक्रिया दिली. दोघांचा हा क्यूट व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ-

या दोघांच्या नात्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहेत, पण अद्याप त्यांनी पुष्टी केलेली नाही. पण नुकतेच ताराने एपी ढिल्लनबरोबरचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो तिच्या ‘थोडी सी दारू’ या म्युझिकल व्हिडीओचे होते. या फोटोंवर वीरने रेड हार्ट व स्टार इमोजी कमेंट केले होते. तर, ताराने त्याला रिप्लाय देत ‘माइन’ असं लिहिलं. त्यानंतर या दोघांनी आपलं नातं इन्स्टाग्रामवर अधिकृत केल्याच्या चर्चा रंगल्या.

वीरबद्दल काय म्हणाली तारा?

वीरला डेट करण्याबद्दल नुकतंच ताराला विचारण्यात आलं. त्यावर तिने “माफ करा, मी आता यासंदर्भात काहीच बोलू शकणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

कोण आहे वीर पहारिया?

वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीरची आही स्मृती शिंदे पहारिया सोबो फिल्म्सच्या संस्थापक आहेत. त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. वीर हा जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा भाऊ आहे. खासदार प्रणिती शिंदे या वीरच्या मावशी होय. वीरच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने यावर्षी ‘स्काय फोर्स’ चित्रपटातून पदार्पण केलं. यात अक्षय कुमारदेखील होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, तारा सुतारियाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘बेस्ट ऑफ लक निक्की’, ‘ओये जस्सी’ आणि ‘द सूट लाईफ ऑफ करण अँड कबीर’ सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिका केल्या होत्या. तसेच ‘अपूर्वा’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘हिरोपंती २’, ‘मर जावां’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये ताराने काम केलं आहे.