‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु दुसरीकडे मात्र सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या १७ व्या दिवशी जादुई आकडा गाठत २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. मात्र, प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झालेली दिसून येत आहे.

हेही वाचा : विकी कौशलच्या पत्नीच्या भूमिकेसाठी कतरिनाची निवड का केली नाही? ‘जरा हटके जरा बचके’चे दिग्दर्शक म्हणाले, “तिचे व्यक्तिमत्त्व…”

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी म्हणजेच २९ मे रोजी केवळ २.१० कोटींची कमाई केली आहे. ही आतापर्यंतची सर्वात कमी आकडेवारी असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द केरला स्टोरी’ने एकूण २५ दिवसांमध्ये २२७.०७ कोटींचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंतची आकडेवारी पाहता हा चित्रपट लवकरच २५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : “तुझ्या लग्नाला बोलावले नव्हतेस…” करण जोहरच्या प्रश्नाला प्रियांका चोप्राने दिले होते सडेतोड उत्तर; ‘तो’ जुना व्हिडीओ व्हायरल

‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५ मे रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने ३५.४९ कोटींची कमाई केली होती. यानंतर अवघ्या ९ दिवसांमध्ये चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला होता आणि त्यानंतर १७ व्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. यानंतर मात्र चित्रपटाची कमाई हळूहळू मंदावली, ‘बॉक्स ऑफिस इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘द केरळ स्टोरी’ने रविवारी (२८ मे) ४.२५ कोटी आणि सोमवारी (२९ मे) २.१० कोटींचे कलेक्शन केले आहे.

हेही वाचा : रणबीर-दीपिकाच्या ‘ये जवानी है दीवानी’ला १० वर्षं पूर्ण; चाहते म्हणतात, “फक्त एक गिफ्ट द्या चित्रपट पुन्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरात या चित्रपटावरून वाद सुरू झाला होता, तर काहींनी चित्रपटाचे कौतुकही केले. या सगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाला असून २०२३ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘द केरला स्टोरी’ हा १०० कोटींची कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरु आहे.