ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांमध्ये नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. सध्या पुन्हा नसीरुद्दीन शाह हे चर्चेत आले. ‘गदर २’ व ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांबद्दल नसीरुद्दीन यांनी केलेलं भाष्य चांगलंच चर्चेत आलं.

त्यांच्या या वक्तव्यावर बऱ्याच लोकांनी टीका केली. काहींनी नसीरुद्दीन यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला तर काहींनी त्यांच्या वक्तव्यावर टीकाही केली. आता यावर ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा व दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनीही यावर भाष्य केलं आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना नसीरुद्दीन म्हणाले, “मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे चित्रपट पाहिलेले नाहीत. पण त्यात नेमकं काय दाखवलं जात आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक बाब आहे की ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत अन् सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांच्या चित्रपटांकडे प्रेक्षक लक्षही देत नाहीयेत.”

आणखी वाचा : रॉ एजंट व देशद्रोह्यामधील चकमक अन्…तब्बू, अली फजलच्या ‘खुफिया’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधतान याबद्दल सुदीप्तो सेन म्हणाले, “एक माणूस चित्रपट न बघताच त्याबद्दल भाष्य करतो हा केवळ मूर्खपणा आहे. आम्ही त्यांचा आदर करतो पण त्यांनी थोडं जबाबदारीने भाष्य करायला हवं. मी गेली १० वर्षं काम करतो आहे, आमच्या चित्रपटाला दोन महिन्यांनी नीट अभ्यास करून सीबीएफसी कडून प्रमाणपत्र मिळालं आहे. जर चित्रपटात तसं काही आपत्तीजनक काही असतं तर त्यांनी चित्रपट पुढे जाऊच दिला नसता, पण ठिके त्यांना बोलायचा अधिकार आहे, पण ही अत्यंत बालिश वृत्ती आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल अभिनेत्री अदा शर्मानेही भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “सगळ्यांच्या मताचा आदर करायला माझ्या घरच्यांनी शिकवलं आहे. आमच्या चित्रपटाला ज्याप्रकारे लोकांनी डोक्यावर घेतलं आहे तेच माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर कुणी चित्रपट न बघताच त्यावर भाष्य करत असेल तर तेदेखील मला मान्य आहे. इंडस्ट्रीतील नसीरुद्दीन शाह हे ज्येष्ठ कलाकार आहेत अन् त्यांच्या मताचा मी आदरच करते. आपल्याला जे वाटेल ते मत आपण मांडू शकतो अशा देशात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे.”