‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अदा शर्मा चांगलीच चर्चेत आली. कोणताही मोठा कलाकार चित्रपटाचा भाग नसताना अवघ्या ९ दिवसांत ‘द केरला स्टोरी’ने १०० कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटावरून अनेक वाद सुरू असले तरीही मुख्य अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मदर्स डे’चे औचित्य साधून अदा शर्माने आपल्या चाहत्यांचे ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत. मुख्य म्हणजे अदाने या वेळी खास मराठीत पोस्ट केली आहे.

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड कायम, ९ दिवसात जमवला १०० कोटींचा गल्ला

अलीकडेच अदाचे मराठी कविता बोलतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. तेव्हा तिने शाळेत मराठी भाषा शिकली असल्याचे सांगितले होते. आता अदाने थेट मराठीमध्ये आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने अदाने आपल्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे अदाचे मराठी भाषेवरचे प्रेम पाहून चाहतेही भारावले आहेत.

हेही वाचा : ‘मदर्स डे’निमित्त आर्या आंबेकरची खास पोस्ट, म्हणाली…

अदा ‘मदर्स डे’च्या शुभेच्छा देताना लिहिते, “यंदा ‘मदर्स डे’च्या निमित्ताने मी माझ्या रिल (चित्रपटातील आई) आणि रिअल लाइफ अशा दोन्ही आईंना तसेच माझ्या आजीला शुभेच्छा देणार आहे. ‘द केरला स्टोरी’च्या निमित्ताने जगभरातील अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या… माझे कौतुक केले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद…” पुढे मराठीतून आभार मानताना अभिनेत्री म्हणते, “धन्यवाद! माझा ‘मदर्स डे’ इतका स्पेशल बनवल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार… तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी माझी आजी सर्वांना व्हर्च्युअल डोसा आणि पायसम पाठवीत आहे.” तिच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : रणवीर-आलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबाबत धर्मेंद्र यांचा खुलासा; म्हणाले, “त्या दोघांकडे पाहून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने शनिवार दिनांक १३ मे या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करीत एका दिवसात तब्बल १९.५० कोटींची कमाई केली आणि चित्रपटाचा १०० कोटींच्या यादीत समावेश झाला आहे. याबद्दल सुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत “एका महिलाप्रधान चित्रपटाला तुम्ही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला,” याकरता अभिनेत्री अदा शर्माने आभार मानले.