विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रॉडक्शन हाऊस निर्मित ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने २०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता OTT चे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Video : कियारा आडवाणीने खरेदी केली नवी कोरी आलिशान कार; किंमत वाचून व्हाल थक्क

मीडिया रिपोर्ट्सनुसार, G5 ला ‘द केरला स्टोरी’ चे डिजिटल अधिकार मिळाले आहेत. पुढील महिन्यात हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. ‘द केरला स्टोरी’ची ओटीटी रिलीज डेट अद्याप उघड झाली नसली तरी निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

‘द केरला स्टोरी’ प्रदर्शनावरून मॉरिशसमध्ये गोंधळ

‘द केरला स्टोरी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. चित्रपटाने अलीकडेच २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असला तरीही या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपट निर्मात्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकांना धमक्यांचे फोन येत आहेत. मॉरिशसमध्ये या चित्रपटावरून चित्रपटगृह मालकाला धमकीचे पत्र मिळाले होते. मॉरिशसमधील ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी ISIS समर्थकांनी चित्रपटगृहाच्या मालकाला धमकीचे पत्र पाठवले आहे. हा चित्रपट दाखविल्यास संपूर्ण चित्रपटगृह बॉम्बने उडवले जाईल, असे या पत्रात लिहिले होते.

हेही वाचा- प्रसूतीनंतर अवघ्या १० दिवसात १० किलो वजन कसं कमी केलं? गौहर खानचं डाएट रुटीन एकदा वाचाच!

‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्यातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये त्यांची भरती या सत्यघटनेवर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. पश्चिम बंगालमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, ती सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली. १५ ते २० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात याची चर्चा होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story film release on ott announces next month dpj
First published on: 31-05-2023 at 14:21 IST