अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये होते, पण दीड वर्षांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं. दोघांनीही आपल्या ब्रेकअपची माहिती दिली नव्हती, पण एका मुलाखतीत टायगरने तो सिंगल असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तो आणि दिशा एकत्र दिसले नाहीत. अशातच आता टायगरच्या आयुष्यात दुसरी ‘दीशा’ आल्याची चर्चा होत आहेत.

समीर वानखेडेंनी सांगितली जुळ्या मुलींची नावं आणि नावामागची गोष्ट; म्हणाले, “आत्याला कॅन्सर झाला होता अन्…”

‘नवभारत टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, टायगर दीड वर्षांहून अधिक काळापासून एका मुलीला डेट करत आहे. तिचे नाव दीशा धानुका असून ती एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये वरिष्ठ पदावर काम करते. दिशा पाटनीपासून वेगळे झाल्यानंतर टायगरने दीशाला डेट करायला सुरुवात केली, असं म्हटलं जातंय.

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

“ते जवळपास दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दीशा टायगरला स्क्रिप्टसाठी मदत करते, तर टायगर तिच्या फिटनेस टिप्स देतो. टायगरच्या कुटुंबालाही दिशा आवडते. सर्वांनाच या दोघांच्या नात्याबद्दल माहिती आहे,” असं त्यांनी सूत्रांचा उल्लेख करत म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातंय. पण मी गेल्या दोन वर्षांपासून सिंगल आहे,” असं टायगरने म्हटल्याचं वृत्त त्यांनी दिलंय. दरम्यान, दुसरीकडे, दीशानेही या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.