Tripti Dimri Shared A Post : तृप्ती डिमरी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तृप्तीने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु, ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे. या चित्रपटानंतर अभिनेत्री अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती. अशातच आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तृप्ती तिच्या कामातून वेळ काढून अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असल्याचं तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळतं. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर गोवा येथील तिचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. अभिनेत्री तिच्या कामातून वेळ काढत सुट्टया एन्जॉय करत असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
गोवा येथे तृप्ती एकटी गेली नसून तिच्याबोरबर तिचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटही असल्याचं सोशल मीडियावरील फोटोंवरुन पाहायला मिळत आहे. तृप्तीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला या व्हिडीओवर तिने सॅमला टॅग केलं आहे. तर या दोघांनी एकच ठिकाणचे काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवरुन शेअर केल्या आहेत. तसंच एकमेकांच्या इन्स्टाग्राम स्टोरीही रिपोस्ट केल्या आहेत.

तृप्ती गोव्यामधील विविध ठिकाणी फिरत असून ती तिथल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेत आहे, हे खास क्षण तिने सोशल मीडियवर शेअर केले आहेत. यावेळी तिने पाणीपुरी, भेळपुरी यांसारख्या पदार्थांवरही ताव मारल्याचं या फोटोमधून पाहायला मिळत आहे. तृप्तीचा कथिच बॉयफ्रेंड सॅम मर्चंटबद्दल बोलायचं झालं तर, तो एक मॉडल आहे. मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी हॉटेल व्यावसायात सक्रिय होता.
सॅम व तृप्ती गोवा येथे पहिल्यांदाच एकत्र फिरायला गेले नाहीयेत; तर यापूर्वीसुद्धा ते फिनलँड येथे एकत्र गेले होते. तर सॅम अनेकदा तृप्तीच्या कामांसाठी तिचं कौतुक करताना दिसतो. ‘स्पिरीट’ या चित्रपटात तिची वर्णी लागल्यानंतर त्याने सोशल मीडियामार्फत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
दरम्यान, तृप्ती डिमरीबद्दल बोलायचं झालं तर, ‘स्पिरीट’ आणि ‘धडक २’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धडक २’मध्ये तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत असणार आहे. तर ‘स्पिरिट’ या चित्रपटात ती दाक्षिणात्य अभिनेता प्रभासबरोबर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.