बॉलीवूडमध्ये अनेक महिन्यांपासून नेपोटीझमचा वाद सुरू आहे. बॉलिवूडमध्ये स्टार किड्सना सहज सिनेमे मिळतात, त्यांना संघर्ष करावा लागत नाही असे नेहमीच म्हटले जाते. यावर आतापर्यंत अनेक कलाकारांनी भाष्य केलं आहे, तर काही वेळा यावरून कलाकारांमध्ये मतभेदही झालेले आहेत. आता अभिनेता तुषार कपूर याने या मुद्द्यावर त्याची मतं मांडली आहेत.

आणखी वाचा : “आपल्या कृतीमुळे देशाला…”, कंगना रणौतच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

तुषार कपूर हा अभिनेता जितेंद्र यांचा मुलगा आहे. तर त्यांची बहीण एकता कपूर हीदेखील टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माती आहे. परंतु तुषार कपूरला इंडस्ट्रीमधून कधीही स्टारकिडची वागणूक मिळाली नाही. तो स्वत:ला इंडस्ट्रीच्या बाहेरचा माणूस समजतो. कसौली येथे सुरू असलेल्या खुशवंत सिंग लिटररी फेस्टिव्हलमध्ये तुषार सहभागी झाला होता. यावेळी दिव्या दत्ताने त्याची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्याने घराणेशाहीवर सुरू असलेल्या वादाबद्दलची त्याची मतं मांडली.

तुषार कपूर म्हणाला, ” इंडस्ट्रीमध्ये सर्व स्टारकिड्ससाठी ‘रेड कार्पेट’ असते असे नाही. जेव्हा मी माझा पहिल्याच चित्रपट ‘मुझे कुछ कहना है’चे शूटिंग करत होतो, तेव्हा मला माझ्या एका सहकलाकाराची बराच वेळ वाट पाहावी लागली. ती कलाकार होती करीना कपूर.

तुषार पुढे म्हणाला, “करीना कपूरसुद्धा एक स्टारकिड‌ आहे. तिच्यासाठी मला १२-१४ तास थांबावे लागले, कारण ती त्यावेळी चार चित्रपटांमध्ये एकत्र काम करत होती. तिचा पहिला चित्रपट रिलीज होणार होता. त्यावेळी पण करिनाची मागणी एवढी होती की तिने एका वेळी अनेक चित्रपट साईन केले होते.”

हेही वाचा : Photos : सुरज पांचोलीपासून ते तुषार कपूरपर्यंत….स्टारकिड्स असूनही बॉलिवूडमध्ये ‘या’ कलाकारांना निर्माण करता आलं नाही स्थान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुषार कपूरने काही वर्षांपूर्वीही घराणेशाहीच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. तेव्हा वडिलांच्या म्हणजेच अभिनेते जितेंद्र यांच्या चुकांमधून खूप काही शिकल्याचे त्याने सांगितले. स्टार किड होण्याचे काही फायदेही आहेत. स्टार किड असल्याने पहिला चित्रपट सहज मिळतो याची कबुली त्याने तेव्हा दिली होती.