कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशात सध्या संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी यावर संताप वक्त केला आहे. कंगना रणौत, आलिया भट्ट, विजय वर्मा, परिणीती चोप्रा, करीना कपूर खान या कलाकारांनी या घटनेवर व्यक्त होत संताप व्यक्त केला आहे. आता ट्विंकल खन्नानेदेखील सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून या घटनेवर भाष्य केले आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला तिने इन्स्टाग्राम पोस्ट करीत लिहिले की, मला ज्या लहानपणी गोष्टी शिकवल्या जात होत्या, त्याच गोष्टी मी माझ्या मुलीला शिकवत आहे.

काय म्हणाली ट्विंकल खन्ना?

अभिनेत्री ट्विंकल खन्नाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “या पृथ्वीवरील आणि देशातील ५० वर्षे आणि मी माझ्या मुलीला त्याच गोष्टी शिकवत आहे, ज्या लहान असताना मला शिकविल्या गेल्या होत्या. एकटी पार्कमध्ये जाऊ नको, शाळेत जाऊ नको, समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नको. एकटी कोणत्याही पुरुषाबरोबर कुठेही जाऊ नको. जरी तुझे काका, भाऊ किंवा मित्र जरी असला तरी त्यांच्याबरोबर एकटी जाऊ नको. सकाळी कुठे एकटी जाऊ नको, सायंकाळी जाऊ नको आणि महत्त्वाचे म्हणजे रात्री तर जाऊच नको. एकटी जाऊ नको; कारण तू कदाचित परत कधीच येऊ शकणार नाहीस.” हे लिहिताना तिने बॅकग्राऊंडला तिरंग्याचा फोटो लावल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: Vedaa Vs Khel Khel Mein: जॉन अब्राहमचा ‘वेदा’ की अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’, कोणत्या सिनेमाने मारली बाजी? जाणून घ्या

बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी कोलकाता बलात्कार घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७८ वर्षांनंतरदेखील भारतात स्त्रियांसाठी सुरक्षित वातावरण नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी, देशात घडणाऱ्या अशा घटनांना कडक कारवाई केली पाहिजे, नियम बनवले पाहिजेत, अशी मागणी केली आहे.

९ ऑगस्टला कोलकातामधील एका पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरवर अमानुष पद्धतीने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. आता या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबरच हृतिक रोशनने आपल्या देशात सगळ्यांना सारखे सुरक्षित वाटले पाहिजे; पण हा बदल व्हायला दशक निघून जाईल. मी त्या कुटुंबाबरोबर आहे. त्याबरोबरच प्रियांका चोप्राने, आपण नाही तर कोण आवाज उठवणार, अशा आशयाची पोस्ट शेअर केल्याचे पाहायला मिळाले. जेनिलिया डिसूजा, सुहाना खान यांनीदेखील न्याय मिळावा, अशी मागणारी करणारी पोस्ट शेअर केली आहे.