बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ट्विंकल एक लेखिका आहे आणि तिचा व्यासंग चांगलाच दांडगा आहे, शिवाय ती तिची मतं रोखठोकपणे मांडण्यासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची मुलाखत घेतली. याविषयी तिने स्वतः माहिती दिली आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मुलाखतीमधील काही फोटो शेअर करत ट्विंकलने ही माहिती दिली. शिवाय या मुलाखतीदरम्यान सुंदर यांच्याकडून काही महत्त्वाच्या गोष्टीदेखील शिकायला मिळाल्या त्यासुद्धा ट्विंकलने या पोस्टमध्ये मांडल्या आहेत. ही पोस्ट शेअर करताना ट्विंकल म्हणाली, “सॅन्ता ये यावर्षी मला ख्रिसमसचं सर्वात सुंदर असं गिफ्ट दिलं आहे, सुंदर पिचाई यांची मुलाखत घ्यायची संधी मला मिळाली.”

आणखी वाचा : Pathaan controversy : दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराजचं शाहरुखच्या ‘पठाण’बद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला “हे खूप…”

पुढे याविषयी सविस्तर बोलताना ट्विंकल म्हणाली, “गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडून मी प्रामुख्याने ३ गोष्टी शिकले. पाहिली म्हणजे भारतात जन्म घेण्याचे जागतिक स्तरावर किती फायदे आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे कायम विनम्र राहण्यासाठी ते नेमकं काय करतात, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचं आपल्या आयुष्यातील स्थान. लवकरच तुम्हाला ही पूर्ण मुलाखत पाहता येईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विंकल ही प्रथम बॉलिवूड अभिनेत्री होती. बॉलिवूडमध्ये अभिनयाचं बस्तान बसवण्यात अपयशी ठरल्याने नंतर तिने तिचा मोर्चा लिखाणाकडे वळवला आणि एक एक लेखिका म्हणून ओळख निर्माण केली. ‘ट्विक इंडिया’ हा तिचा डिजिटल कंटेंट प्लॅटफॉर्म आहे. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर तिने अक्षय कुमारशी लग्न केलं. या दोघांना दोन मुलंदेखील आहेत.