Chhaava box office collection day 29:  अभिनेता विकी कौशलचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २९ दिवस झाले आहेत. ‘छावा’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’ला देशांतील बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘छावा’ने चित्रपटगृहांमध्ये पाचव्या गुरुवारी ४ कोटींहून जास्त कमाई केली, अशी माहिती इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी वाढ झाली. शुक्रवारी सिनमाने देशभरात एकूण ७.२५ कोटी रुपयांची कमाई केली, यात तेलुगू भाषेतील कलेक्शनचाही समावेश आहे.

‘छावा’ चित्रपटाची देशांतील एकूण कमाई ५४६ कोटी रुपये झाली आहे. हे कलेक्शन ‘पठाण’पेक्षा ३ कोटी रुपयांनी जास्त आहे. ‘छावा’च्या कलेक्शनमध्ये गुरुवारी घट झाली होती, पण शुक्रवारी वाढ झाली. शुक्रवारी जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला ‘द डिप्लोमॅट’ रिलीज झाला आहे. ‘द डिप्लोमॅट’ने पहिल्या दिवशी चांगली ओपनिंग केली. सिनेमाने ४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी भाषेतील ‘छावा’ने शुक्रवारी ६.५ कोटी रुपये कमावले आणि तेलगू भाषेत ७५ लाख रुपये कमावले.

जवळपास एक महिन्यांपासून बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘छावा’च्या कलेक्शनमध्ये गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. या वीकेंडला हा चित्रपट ५५० कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा आहे. ‘छावा’चे कलेक्शन सध्या संदीप रेड्डी वांगा याच्या अॅनिमल सिनेमाच्या तुलनेत थोडे कमी आहे. अॅनमिलचे कलेक्शन ५५३.८७ कोटी रुपय आहे. मार्चमध्ये सलमान खानचा ‘सिकंदर’ रिलीज होणार आहे. त्यानंतर कदाचित ‘छावा’च्या कमाईला फटका बसू शकतो. वीकेंडला म्हणजेच शनिवार व रविवारी ‘छावा’ने शुक्रवारप्रमाणे कमाई केली तर तो ॲनिमलच्या कलेक्शनला मागे टाकेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘छावा’च्या जगभरातील कमाईबद्दल बोलायचे झाल्यास वीकेंडला सिनेमाचे एकूण कलेक्शन ७५० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. ‘छावा’च्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बजेटची रक्कम वसूल केली होती. चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत, रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. या सिनेमात विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, डाएना पेंटी, निलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी हे कलाकारही आहेत.