Vicky Kaushal Favourite Food : विकी कौशल सध्या त्याच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘मसान’, ‘सॅम बहादूर’, ‘संजू’, ‘उरी’, ‘राझी’ अशा अनेक चित्रपटांमुळे विकी घराघरांत लोकप्रिय झाला. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून विकीने आजच्या घडीला एवढं मोठं यश मिळवलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विकीने जुन्या आठवणींना उजाळा देत कॉलेजच्या दिवसांमध्ये तो कशी मजा करायचा, त्याचे आवडीचे पदार्थ काय आहेत याबद्दल सांगितलं आहे.

विकी कौशलने अभियांत्रिकीमध्ये पदवी संपादन केली आहे. “कॉलेजमध्ये असताना वांद्रे परिसरात खूप फिरायचो, रात्री आम्ही मित्र – मित्र एकत्र भेटलो की, दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरात फिरायला जायचो.” असं विकी कौशलने नुकत्याच ‘Mashable इंडिया’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

हेही वाचा : Video : अंबानींच्या धाकट्या सूनेचा जामनगरमध्ये भव्य गृहप्रवेश! अनंत-राधिकाचा गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल

विकी कौशलला आवडतात हे पदार्थ ( Vicky Kaushal)

विकी कौशलला त्याच्या आवडत्या पदार्थांविषयी विचारल्यावर अभिनेता म्हणाला, “रात्री शूटिंगवरून थकून घरी आल्यावर मला साधा डोसा, खोबऱ्याची चटणी, चिकन लॉलीपॉप विथ शेजवान चटणी हे पदार्थ खायला खूप आवडतात.” याशिवाय मी मालवणी पदार्थांचा खूप मोठा फॅन ( चाहता ) आहे असं सांगत विकीने विलेपार्ले येथील एका हॉटेलचा उल्लेख केला आहे.

“मालवणी पदार्थ मला खूप आवडतात आणि त्यातही मला बोबींल फ्राय खूप आवडतात तेच मी नेहमी खातो” असं विकी कौशलने सांगितलं. याशिवाय “चित्रपटसृष्टीत मी यशस्वी झाल्यानंतर माझ्या घरी काहीच बदल झाला नाही. आई-वडिलांच्या वागण्यात मला कधीही वेगळेपणा जाणवला नाही. ते माझ्याशी पूर्वीप्रमाणेच वागतात. मी सामान्य कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झालो आहे, आजही आमच्या घरचे सर्व नियम मी आणि माझा भाऊ पाळतो.” असं अभिनेत्याने ( Vicky Kaushal ) जुन्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.

vicky kaushal
विकी कौशल ( vicky kaushal )

हेही वाचा : मोदक, भरलेली वांगी, ठेचा अन्…; अंबानींच्या लग्नात मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल, ‘असा’ होता मेन्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विकी कौशलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा ‘बॅड न्यूज’ चित्रपट येत्या १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तृप्ती डिमरी, एमी विर्क यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय या चित्रपटातील “तौबा तौबा…” गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.