बॉलीवूड अभिनेते विकी कौशल आणि रणबीर कपूर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करतात. मग अलीकडेच आलेले ‘सॅम बहादुर’ आणि ‘अ‍ॅनिमल’ का असेना, दोघांच्याही चित्रपटांना चाहत्यांकडून वाहवा मिळवली. परंतु, हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने ‘सॅम बहादुर’ बॉक्स ऑफिसवर तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही.

‘सॅम बहादुर’ आणि ‘अ‍ॅनिमल’ हे दोन्ही चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित झाले. ‘अ‍ॅनिमल’ हा संदीप रेड्डी वांगा यांचा अ‍ॅक्शन चित्रपट; तर ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित एकंदरीत हे दोन्ही वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट होते.

हेही वाचा… पूजा सावंतचा बिकिनी लूक होतोय व्हायरल; हनिमूनचे फोटो शेअर करत म्हणाली…

नुकत्याच झालेल्या ‘द वीक मॅगेजिन’च्या मुलाखतीत विकीने या क्लॅशबद्दल मौन सोडले. विकी म्हणाला, “सॅम बहादुर हा चित्रपट करताना आम्हाला आधीच माहीत होतं की, ही एक टेस्ट मॅच असेल. आम्हाला माहीत होतं की हा ‘ॲनिमल’सारखा मसाला चित्रपट नाही आहे. याचा बॉक्स ऑफिसवर परिणाम होणार हेसुद्धा आम्हाला माहीत होतं.”

चित्रपटाबद्दल सांगताना विकी म्हणाला, “जर हा चित्रपट प्रेक्षकांशी जोडला गेला नसता, तर तो केव्हाही प्रदर्शित झाला असता तरीही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नसता. जसजसे आठवडे सरत होते तसतसे लोक चित्रपटाबद्दल अधिकाधिक बोलू लागले. जानेवारी महिन्यातही ‘सॅम बहादुर’चे शो सुरू होते आणि त्याचा मला खूप आनंद झाला होता.”

हेही वाचा… वरुण धवनची पत्नी नताशा दलाल ‘या’ कारणामुळे होतेय ट्रोल; नेटकरी म्हणाले, “गरोदर असून…”

रणबीर कपूर आणि विकी कौशल यांनी ‘संजू’ चित्रपटात एकत्र काम केले होते. रणबीरने विकीच्या नेटफ्लिक्स चित्रपट ‘लव्ह पर स्क्वेअर फूट’मध्येही लहानशी भूमिका साकारली होती. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, ‘सॅम बहादुर’ने १३०.३० कोटींची जागतिक कमाई केली; तर ‘अ‍ॅनिमल’ने चक्क ९१५ कोटींची जागतिक कमाई केली.

बॉलीवूडमध्ये एक दशक पूर्ण केल्यानंतर आणि ‘मसान’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’, ‘संजू’ b ‘डंकी’ यांसारखे हिट चित्रपट दिल्यानंतर विकीला स्टारडम मिळाले आहे, असे त्याला वाटते का, असे विचारले असता, विकी म्हणाला, “लोकप्रियता आणि स्टारडम यांच्यातील रेषा अस्पष्ट होत चालली आहे. आता सर्वांत लोकप्रिय हा कलाकाराचा चेहरा आहे. खरं सांगायचं झालं, तर स्टार ही अशी व्यक्ती असते; ज्याच्यासाठी लोक चित्रपट पाहतात. मग तो चांगला असो किंवा वाईट असो. मला वाटत नाही की, मी ते आतापर्यंत साध्य केलं आहे.”

हेही वाचा… “…सणसणीत कानाखाली मारलं आहे”; अजय पुरकर यांचं ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, विकीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, विकी ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ या आगामी चित्रपटात तृप्ती डिमरीबरोबर झळकणार आहे. तर, छत्रपती संभाजी महारांजावर आधारित ‘छावा’ चित्रपटात रश्मिका मंदानाबरोबर विकी दिसणार आहे. ‘छावा’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.