scorecardresearch

Premium

“लग्न राहूच दे,” चिडलेल्या कतरिना कैफने लग्नाच्या दोन दिवसाआधी विकी कौशलला दिलेली धमकी; अभिनेत्याने केला खुलासा

कतरिना कैफ विकीवर का संतापली होती? अभिनेत्याने सांगितलं कारण

vicky kaushal reveals he changed after marrying katrina kaif
विकी कौशल कतरिना कैफ (फोटो – इन्स्टाग्राम)

विकी कौशल आणि कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. विकी आणि कतरिनाने राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली होती. विकी अनेकदा त्याच्या लग्नाचे, वैवाहिक आयुष्यातले किस्से सांगत असतो. विकीने नुकताच खुलासा केला आहे की कतरिनाने लग्नाच्या दोन दिवसाआधी त्याला धमकी दिली होती. लग्न राहूदेत, असं ती म्हणाली होती. नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात.

विकीने लग्न केलं तेव्हा तो ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाची शूटिंग करत होता. शूटिंगच्या तारखा आणि लग्नाच्या तारखा क्लॅश झाल्या. विकीला लग्नानंतर दोन दिवसांनी शूटिंगला बोलावण्यात आलं होतं. हे कळताच कतरिनाला राग आला आणि तिने विकीला धमकी दिली होती. विकी म्हणाला, “मी माझ्या लग्नापूर्वी चित्रपटाचा अर्धा भाग शूट केला होता आणि त्यानंतर मी माझ्या लग्नासाठी फ्लाइट घेतली. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी ते मला सेटवर बोलवत होते. एकीकडे चित्रपट निर्मात्याकडून दबाव निर्माण केला जात होता आणि दुसरीकडे कतरिनाने धमकी दिली की, दोन दिवसांनी सेटवर जायचं असेल तर लग्न राहूच दे. त्यानंतर मी निर्मात्यांना ‘नाही’ म्हणालो आणि सेटवर लग्नानंतर पाच दिवसांनी गेलो.”

Pooja bhatt birthday special hero Bollywood film industry journey
Pooja Bhatt: वडिलांशी लिपलॉक ते न्यूड फोटोशूट! अशी आहे बॉलिवूडच्या ‘बॉम्बे बेगम’ची गोष्ट
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Both hit and flop are important for an actor tripti dimri
‘हिट’ आणि ‘फ्लॉप’ दोन्ही अभिनेत्यासाठी महत्त्वाचं! – तृप्ती डिमरी
Vijay Sethupati Co-actress Dies As Drunk Son Beats Her Kadaisi Vivasayi actor Kasiammal Son Arrested For Killing Mother at 74
विजय सेतुपतीच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलाने केलेल्या मारहाणीत मृत्यू; मद्यधुंद लेकाला पोलिसांकडून अटक

“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

कतरिनाशी लग्न केल्यानंतर आयुष्य कसे बदलले हेही विकीने सांगितले. विकी म्हणाला, “लग्न खरोखरच खूप सुंदर होतं आणि आपल्यासाठी एक चांगला जोडीदार शोधणं हा खरोखरच एक आशीर्वाद आहे. चांगला जोडीदार असेल तर तुम्हाला घरी परतायची इच्छा होते. ती खूप चांगली आहे. तिच्याबोबर राहणं आणि आयुष्य एक्सप्लोर करणं खूप मजेदार आहे. मी तिच्यासोबत खूप प्रवास करत आहे, असं काहीतरी मी यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं.”

‘पिंकव्हिला’ला दिलेल्या या मुलाखतीत विकीने खुलासा केला की एकाच इंडस्ट्रीत असूनही तो आणि कतरिना कामाबद्दल फारसं बोलत नाहीत. “आम्ही कामाबद्दल जास्त चर्चा करत नाही. आम्ही दोघं एकाच इंडस्ट्रीतून आहोत, त्यामुळे आम्ही त्याबद्दल बोलतो पण स्क्रिप्ट्स आणि इतर गोष्टींबद्दल बोलत नाही,” असं विकीने सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal reveals katrina kaif threatened him about wedding over his shooting schedule hrc

First published on: 24-11-2023 at 17:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×