Eklavya: The Royal Guard Movie: अमिताभ बच्चन, सैफ अली खान, संजय दत्त आणि विद्या बालन यांच्या भूमिका असलेला विधू विनोद चोप्राचा २००७ चा ‘एकलव्य: द रॉयल गार्ड’ (Eklavya: The Royal Guard) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. मात्र या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले होते. हा चित्रपट त्यावर्षीच्या ऑस्करला भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवला होता. आता एका मुलाखतीत विधू विनोद चोप्रा यांनी सांगितलं की बजेट कमी असल्याने त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी ६५ हजार रुपये भाडं असलेली खोली बुक करण्यास नकार दिला होता.

विधू विनोद चोप्रा एका जुन्या मुलाखतीत या चित्रपटाचे किस्से सांगितले होते. “मी अमिताभ बच्चन यांच्यासाठी रूम बुक करू शकलो असतो, पण मुख्य अडचणी अशी होती की नंतर मला इतर स्टार्स सैफ व संजय दत्त यांच्यासाठीही रूम बुक कराव्या लागल्या असत्या. यामुळे चित्रपटाचे बजेट खूप जास्त वाढले असते, मग मी एकलव्यासारखा चित्रपट बनवू शकलो नसतो,” असं ते म्हणाले होते.

२१ वर्षांचा संसार मोडला, आता मॉडेलला डेट करतोय बॉलीवूड अभिनेता, दोन मुलांचा बाबा झाल्यावरही केलं नाही लग्न, कारण सांगत म्हणाला…

करिअरमध्ये नंतर पैसे कमावल्यावर विधू विनोद चोप्रा यांनी बिग बींना महागडी भेटवस्तू दिली होती. स्वतःजवळ मारुती व्हॅन होती, तेव्हा आपण अमिताभ यांना चार कोटी रुपयांची रोल्स रॉयस फँटम भेट दिली होती, असं त्यांनी सांगितलं. त्यांना एवढी महागडी भेट दिल्यावर आईची प्रतिक्रिया काय होती त्याची आठवणही चोप्रा यांनी सांगितली होती.

Eklavya The Royal Guard
‘एकलव्य: द रॉयल गार्ड’ चित्रपटाचे पोस्टर (फोटो – सोशल मीडिया)

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायच्या लग्नाची मिठाई शत्रुघ्न सिन्हांनी पाठवली होती परत; कारण सांगत म्हणालेले, “बच्चन कुटुंबाने…”

अमिताभ यांना महागडी कार भेट दिल्यावर आईने…

When Vidhu Vinod Chopra Gifted Rolls Royce Phantom to Amitabh Bahchan: “मी हा प्रसंग कधीच विसरणार नाही. अमिताभ यांना कार गिफ्ट करण्यासाठी मी माझ्या आईला घेऊन गेलो होतो. तिने त्यांना कारची चावी दिली. मग ती परत आली, माझ्या गाडीत बसली, जी निळ्या रंगाची मारुती व्हॅन होती. तिने बिग बींना ‘लंबू’ म्हटले. त्यावेळी माझ्याकडे ड्रायव्हर नव्हता म्हणून मी गाडी चालवत होतो. ती मला म्हणाली, ‘तू ‘लंबू’ला गाडी दिलीस?’ मी ‘होय’ म्हटलं. मग ती म्हणाली, ‘तू स्वतःसाठी कार का घेत नाहीस?’ मी तिला म्हणालो, मी कार घेईन पण त्याला अजून वेळ आहे. ती म्हणाली ‘तू भेट दिलेली गाडी ११ लाखांची असेल ना.’ मी तिला कारची किंमत सांगितल्यावर तिने मुर्ख म्हणत मला झापड मारली होती,” असं विधू विनोद चोप्रा म्हणाले.

संजय दत्तने सायरा बानो यांना आईसमोर भर कार्यक्रमात केलं होतं प्रपोज, अभिनेत्री किस्सा सांगत म्हणाल्या, “नर्गिस आपा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला ’12th फेल’ चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. अवघ्या २० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात ७० कोटींच्या जवळपास कमाई केली. यात विक्रांत मॅस्सी व मेधा शंकर मुख्य भूमिकेत होते.