बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांच्या यादीत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे नाव कायमच चर्चेत असते. ते दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जोडीचे जगभरात चाहते आहेत. सध्या विराट-अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी नाचताना विराटच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अनुष्का शर्माने नुकतंच विराटबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघेही एका पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओची सुरुवात विराट अनुष्काच्या एंट्रीने होते. त्यावेळी ते दोघेही जिममध्ये पाय हातात पकडत एक स्टेप करताना दिसत आहे.
आणखी वाचा : Video : रेड कार्पेटवर चालताना अनुष्काचा ड्रेस हिल्समध्ये अडकला, विराट कोहलीने केलं असं काही…

यावेळी विराट हा अनुष्काच्या पुढे नाचत आहे. त्यावेळी नाचताना अचानक अनुष्काचा गुडघा विराटला लागतो आणि तो जोरात ओरडतो. तर अनुष्काही विराटकडे पाहून हसायला लागते.

विराटच्या पायाला दुखापत झाल्याचे पाहताच त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. अनेकांनी त्याला विविध सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. सध्या आयपीएल सुरु आहे, दुखापतींपासून दूर राहा, असा सल्ला अनेक नेटकऱ्यांनी विराटला दिला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : Video : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर मानसी नाईकने खरेदी केले नवीन घर, म्हणाली “या रखरखीच्या जगण्यात वावरताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनुष्का शर्मा लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात ती क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची भूमिका साकारत आहे. तर विराट कोहली आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चँलेजर्स बँगलोर या संघाकडून खेळताना दिसत आहे.