बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केली की घातपातामुळे तिचा मृत्यू ओढवला? याबाबत अद्याप संभ्रम आहे. दिशाच्या मृत्यूनंतर काहीच दिवसात अभिनेता सुशांत सिंह राजपूतही राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. या दोघांच्या मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी अनेकांनी मागणी केली. आता पुन्हा या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. अशातच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी एक ट्वीट केलं आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. समाजात घडणाऱ्या त्यांना न पटणाऱ्या गोष्टींबद्दल ते अगदी उघडपणे भाष्य करताना दिसतात. आता दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची पुन्हा एकदा चौकशी होत असल्याचे कळतात त्यांनी सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा यासाठी एक ट्वीट केलं आहे.

आणखी वाचा : विस्कटलेले केस, वाढलेली दाढी अन्…; मृत्यूपूर्वी सुशांत सिंह राजपूतची झाली होती दयनीय अवस्था? जुना व्हिडीओ व्हायरल

विवेक अग्निहोत्री यांनी त्यांचा आणि सुशांत सिंह राजपूतचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “वो मुझे भी नहीं छोड़ेंगे… कौन थे ‘वो’, सुशांत, मेरे दोस्त?” हे ट्वीट करताना त्यांनी ‘सुशांतसिंह राजपूत’ आणि ‘राईट टू जस्टिस’ हे दोन हॅशटॅगही वापरले आहेत.

हेही वाचा : बॅकग्राऊंड डान्सर ते प्रसिद्ध अभिनेता, जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतविषयी ‘या’ खास १५ गोष्टी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्या या ट्विटवर त्यांचे चाहते, सुशांतसिंह राजपूतचे चाहते कमेंट्स करत प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी विवेक अग्निहोत्री यांनी सुशांत सिंह राजपूतबद्दल दाखवलेल्या या पुढाकाराचे कौतुक करत आहेत. त्यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.