Wamiqa Gabbi Talks about Alia Bhat : आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील कामासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. आलियाने तिच्या अभिनयाने जरी प्रेक्षकांची मनं जिंकली असली तरी कला, कौशल्य यासह इंडस्ट्रीमध्ये चांगली कामं मिळवण्यासाठी ओळख किंवा कोणाच्यातरी पाठिंब्याची गरज पडते असं काही कलाकार अनेकदा म्हणताना दिसतात.

आलिया भट्टलासुद्धा असाच कायम पाठिंबा मिळत आला आहे. आलियाला प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने नेहमीच पाठिंबा दिला आहे. करण जोहरची निर्मिती असलेल्या आणि त्याने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमध्ये आलियाने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. करणनेच तिला इंडस्ट्रीत लाँच केलं होतं, त्यामुळे तिला कायम करण जोहरचा पाठिंबा असल्याने तिने इतकं यश मिळवलं किंवा तिला चांगली कामं मिळवण्यात करणची मदत झाली असं अनेकदा म्हटलं जातं. अशातच आता ‘भूल चूक माफ’फेम अभिनेत्री वामिका गब्बीनेही आलिया भट्टला करण जोहरचा कायम पाठिंबा मिळत आला आहे असं म्हटलं आहे

वामिका गब्बीने नयनदीप रक्षितला मुलाखत दिलेली. यामध्ये तिला अभिनेत्रींकडून काय चोरायला किंवा घ्यायला आवडेल असं विचारण्यात आलं होतं. यादरम्यान जेव्हा आलियाचं नाव घेण्यात आलं, तेव्हा तिने करण जोहरचं नाव सांगितलं. वामिका म्हणाली, तिलासुद्धा करण जोहरसारख्या मोठ्या व्यक्तीचा पाठिंबा मिळावा असं वाटतं. कारण करण जोहरने आलिया भट्टला खूप पाठिंबा दिला आहे. ती पुढे म्हणाली, “करण जोहरसारख्या व्यक्तीकडून पाठिंबा मिळणं आणि त्यांच्यासारख्या माणसासह चांगले संबंध असणं ही खूप छान गोष्ट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वामिकासह यापूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या रायनेही आलिया भट्टला करण जोहरचा खूप पाठिंबा मिळाला आहे, असं म्हटलं होतं. ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली होती, “मी हे तिलासुद्धा सांगितलं आहे. करणने तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीपासून खूप पाठिंबा दिला आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीकडून पाठिंबा मिळणं ही खूप चांगली गोष्ट आहे. कलाकार म्हणून जर तुम्हाला कायम चांगलं काम करण्याची संधी मिळत आली असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे. मला हे सुद्धा महत्त्वाचं वाटतं की तिला संधी मिळाली, पण तिनेसुद्धा खूप मेहनत घेतली आहे.”