अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. चित्रपटसृष्टीतील कौटुंबीक पार्श्वभूमी नसतानाही त्याने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. एकापेक्षा एक हटके भूमिका साकारत राजकुमारने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज ३१ ऑगस्ट रोजी तो त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने आपण त्याचं खरं आडनाव व त्याने मूळ आडनाव का बदललं याबाबत जाणून घेणार आहोत.

‘ड्रीम गर्ल २’ च्या कमाईत सहाव्या दिवशी मोठी वाढ, बजेट अवघे ३५ कोटी पण आतापर्यंत कमावले तब्बल…

अनेक मुलाखतींमध्ये राजकुमारने त्याच्या खऱ्या आडनावाबद्दल सांगितलंय. तसेच ते का बदललं याचं कारणही तो सांगतो. राजकुमारचं खरं आडनाव राव नसून यादव आहे, म्हणजेच त्याचं खरं नाव राजकुमार यादव आहे. आडनाव बदलण्यामागचं कारण राजकुमारने सांगितलं. एका शोमध्ये राजकुमार म्हणाला, “मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर माझं आडनाव लावत नव्हतो. मात्र माझ्या नावामुळे खूप गोंधळ उडत होता कारण इंडस्ट्रीमध्ये आधीच काही राजकुमार होते. राजकुमार संतोषी, राजकुमार गुप्ता, राजकुमार हिरानी हे दिग्गज होते. ”

“मी १५ व्या वर्षापासून त्यांचं कर्ज फेडलं”, गश्मीरने सांगितली वडिलांनी घर सोडल्यावरची परिस्थिती; म्हणाला, “बँकेत हाता-पाया पडून…”

पुढे राजकुमार म्हणाला, “मला अनेकदा कॉल यायचे ज्यात लोक मला असिस्ट करा म्हणायचे आणि मी गोंधळून जायचो. मी अभिनेता आहे तर असिस्ट का करू? तेव्हा माझ्या लक्षात आलं की तीन दिग्दर्शकांची नावं राजकुमार असल्याने हा गोंधळ होत आहे. त्यामुळे मी आडनाव लावण्याचा निर्णय घेतला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी राजकुमारने आपलं यादव आडनाव न वापरता राव का लावलं, हेही सांगितलं. हरियाणामध्ये आपलं आडनाव यादव आहे, पण तिथे यादवांच्या मुलांच्या नावापुढे अनेकदा राव हे टोपण नाव दिलं जातं. त्यामुळे आपण यादव न लावता राव हे आडनाव लावलं, असं राजकुमार म्हणाला होता.