दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक होत्या. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. एकीकडे जेव्हा कलाकार त्यांच्या करिअरला गती मिळावी म्हणून अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्यास इच्छुक असायचे. तर दुसरीकडे आपण अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दुय्यम पात्र साकारणार नाही, या मतावर श्रीदेवी ठाम होत्या. कारण त्यांना महिला-केंद्रित चित्रपटांचा भाग व्हायचं होतं. १९९२ साली आलेल्या ‘खुदा गवाह’ या चित्रपटात आपल्याबरोबर श्रीदेवींनी काम करण्यास होकार द्यावा, यासाठी अमिताभ बच्चन यांनी गुलाबांनी भरलेला ट्रक मागवला होता.

सत्यार्थ नायक यांनी लिहिलेल्या ‘श्रीदेवी: द इटरनल स्क्रीन गॉडेस’ या पुस्तकात दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान यांनी एक किस्सा सांगितला आहे. त्या श्रीदेवींसह एका गाण्यावर काम करत होत्या. एकदा श्रीदेवींवर अमिताभ बच्चन यांनी पाठवलेल्या फुलांचा वर्षाव करण्यात आला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली होती.

प्रसिद्ध अभिनेत्याने केलं अरेंज मॅरेज, सात वर्षांनी लहान आहे पत्नी, लग्नाचे फोटो आले समोर

“ट्रक आला तेव्हा आम्ही गाण्याचे शूटिंग करत होतो. त्यांनी श्रीदेवीला जवळ उभं केलं आणि तिच्यावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला. ते दृश्य अविस्मरणीय होतं,” असं सरोज खान यांनी सांगितलं होतं. हे सगळं पाहून श्रीदेवी प्रभावित झाल्या पण चित्रपट करण्यासाठी त्या तयार झाल्या नाहीत. कारण त्यांना वाटलं की त्यांच्यासाठी इतकं पुरेसं नाही. मग त्यांनी एक अट घातली की त्या बिग बींसह एका चित्रपटात काम करेल, ज्यात त्या अमिताभ यांची पत्नी आणि मुलगी या दोन भूमिका साकारेल. चित्रपट निर्माते मनोज देसाई आणि मुकुल आनंद यांनी त्यांची अट मान्य केली आणि अशा रितीने श्रीदेवी व अमिताभ बच्चन यांनी ‘खुदा गवाह’मध्ये एकत्र काम केलं.

“गांधीजींनी एका हिंदू भजनात ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ हे शब्द टाकून…”, विवेक अग्निहोत्रींची पोस्ट; म्हणाले, “त्यांचे शेवटचे शब्द…”

‘खुदा गवाह’च्या आधी रमेश सिप्पी यांनी त्यांच्या ‘राम की सीता श्याम की गीता’ या चित्रपटात श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांना साईन केलं होतं. त्यात दोघांच्याही दुहेरी भूमिका होत्या. “जुम्मा चुम्मा” हे गाणंही या चित्रपटाचा भाग असणार होतं. पण काही कारणांमुळे या चित्रपटाची निर्मितीच होऊ शकली नाही आणि अखेर ते गाणं ‘हम’ चित्रपटात अमिताभ बच्चन व किमी काटकर यांच्यावर शूट करण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेक्षकांना अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी अखेरचे २०१२ मध्ये एका चित्रपटात बघायला मिळाले. गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.