Happy Birthday Dharmendra Deol: बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे कायम चर्चेत असतात. या वयातही असलेला कमालीचा फिटनेस आणि अभिनयाची दांडगी इच्छाशक्ति यामुळेच आजही धर्मेद्र ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’सारख्या चित्रपटातून आपली छाप सोडतात. आज धर्मेद्र हे त्यांचा ८८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडचा एक सुवर्णकाळ त्यांनी पाहिला आहे अन् त्या काळात त्यांनी एकाहून एक असे सुपरहीट चित्रपट दिले आहेत.

१९६० पासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. एवढी मोठी करिकीर्द असूनही धर्मेंद्र यांना ३७ वर्षांनी केवळ एकच फिल्मफेअरचा लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. जेव्हा धर्मेंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्यांनी त्यांची एक धमाल आठवण त्यावेळी मंचावर सगळ्यांसमोर शेअर केली.

Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

आणखी वाचा : “मी कमालीचा अस्वस्थ…” तृप्ती डिमरीच्या बूट चाटण्याच्या सीनबद्दल ‘अ‍ॅनिमल’ फेम सिद्धार्थ कर्णिकची प्रतिक्रिया

दरवर्षीच्या पुरस्कारांसाठी धर्मेद्र तयारी करायचे परंतु त्यांना काही फिल्मफेअर पुरस्कार मिळायचा नाही. १९९७ मध्ये जेव्हा दिलीप कुमार व सायरा बानू यांच्या हस्ते धर्मेद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला तेव्हा आपल्या भाषणात धर्मेद्र म्हणाले, “मला गेली ३७ वर्षं या इंडस्ट्रीत काम करतोय, पण आजवर मला कोणताही पुरस्कार मिळाला नाही. दरवर्षी मी या पुरस्कारसोहळ्यासाठी नवा सूट शिवायचो, त्यासाठी मॅचिंग टाय घ्यायचो पण मला कधीच हा पुरस्कार मिळाला नाही. माझे कित्येक चित्रपट गोल्डन जुबली, सिल्व्हर जुबलीपर्यंत पोहोचले, पण तरीही मला पुरस्कार मिळाला नाही.”

पुढे धर्मेंद्र म्हणाले, “त्यानंतर काही वर्षांनी मी उमेद सोडून दिली. मी नंतर असं ठरवलं की आता जेव्हा केव्हा पुरस्कार देतील तेव्हा मी त्या सोहळ्याला टी-शर्ट परिधानच करून जाईन नाहीतर अंडरवेअरच परिधान करून जाईन.” धर्मेंद्र यांच्या या वाक्यावर तिथे उपस्थित असलेले लोक हसले. पुढे लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळण्याबद्दल धर्मेद्र म्हणाले, “आज मला हा पुरस्कार मिळाला आहे, यात मला माझे आधीचे १५ पुरस्कार दिसत आहेत जे तेव्हा मला मिळायला हवे होते.”

सर्वसाधारणपणे लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हा तुमच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात दिला जातो, पण तरी इतकी वर्षं धर्मेंद्र यांना कोणताही पुरस्कार का मिळाला नव्हता याबद्दल जेव्हा विचारणा झाली तेव्हा त्यांनी अत्यंत सुंदर असे उत्तर दिले. ‘पीटीआय’शी संवाद साधताना ते म्हणाले, “लाईफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डचा अर्थ सर्वसाधारणपणे निवृत्ती घेणे हा असतो, पण मी स्वस्थ बसणार नाही. मला आधी पुरस्कार का मिळाले नाहीत यावर भाष्य करणार नाही. पण ‘फूल और पत्थर’, ‘सत्यकाम की कथा’ ‘चुपके चुपके’, ‘शोले’ अशा काही चित्रपटांसाठी मला पुरस्कार मिळायला हवा होता असं वाटतं.”