अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या अभिनयाबरोबर रागीट स्वभावासाठी ओळखले जाते. त्या अनेकदा चिडचिड करताना, पापाराझींवर भडकल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचे फोटो घेणाऱ्या, त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्या चाहत्यांना अनेकदा फटकारताना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. यात त्या त्यांची नात नव्याबरोबर दिसत होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी पाहून त्या रागावल्याचेही स्पष्ट दिसत होते. तसेच काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन यांच्याबरोबर सेल्फी काढणाऱ्या एका चाहत्यालाही त्यांनी चांगलेच फटकारले होते.

जया बच्चन यांचा स्वभाव असा का आहे? त्या इतक्या का रागवतात? तसेच त्या चाहत्यांना का फटकारतात? असे अनेक प्रश्न अनेकदा उपस्थित होतात. यावर काही वर्षांपूर्वी त्यांची मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक बच्चन यांनी भाष्य केले होते. त्यानंतर आता जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ २०१४ दरम्यान दिलेल्या मुलाखतीतील आहे.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण

२०१४ मध्ये जया बच्चन यांनी गुफ्तगू या एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत जया बच्चन यांना त्यांच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. तुम्हाला अनेकदा चिडचिड स्वभावाच्या किंवा सतत रागावणाऱ्या स्वभावासाठी ओळखले जाते. याचे नक्की कारण काय? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला होता.

यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाला, “मी यावर काय उत्तर देऊ. मला मूर्खपणा अजिबात सहन होत नाही. जर तुम्ही मला अशी काही गोष्ट सांगितली ज्यातून मी काही तरी बोध घेऊ शकेन किंवा त्यातून माझ्या ज्ञानात भर पडेल तर मी चिडचिड करणाऱ्या स्वभावाची आहे, असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. हो मला पटकन राग येतो. पण याचा अर्थ मी सतत चिडचिड करते असा होत नाही. लोकांनी माझा वेळ वाया घालवला की मला राग येतो. मी त्यांचा मूर्खपणा सहन करू शकत नाही.”

आणखी वाचा : “तिला गुदमरल्यासारखे…” जया बच्चन यांच्या स्वभावावर श्वेता- अभिषेकचे स्पष्ट उत्तर

“मी बालिश आहे असे मला माझे पती अमिताभ बच्चन यांनीही सांगितले आहे. मी प्रत्येक गोष्टींवर प्रतिक्रिया देत असते. मला लोकांचे बोलणे सहन होत नाही आणि त्यामुळे मी लगेच प्रतिक्रिया देते. मी कोणत्याही गोष्टींवर फार लवकर प्रतिक्रिया देते. हे बालिशपणाचे आहे की नाही याबद्दल मला माहिती नाही. पण मी फार सरळ विचार करणारी आहे. एखाद्याने माझ्या काही केलं तर मी त्यावर लगेच प्रतिक्रिया देते. त्याचा भावनांचा अजिबात विचार करत नाही”, असेही जया बच्चन यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान जया बच्चन या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत