आपल्या सडेतोड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत सातत्याने बॉलिवूडवर टीका करत असते. कंगनाने बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरला बऱ्याचदा टोमणे मारत असते. त्याचबरोबर एका जुन्या मुलाखतीसंदर्भात तिने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. कंगनाने चित्रपट निर्मात्याची एक मुलाखत क्लिप शेअर केली आहे ज्यामध्ये करण कंगनाला चित्रपटात काम न देण्याबद्दल भाष्य करताना दिसत आहे.

कंगनाने शेअर केलेली करण जोहरची जुनी व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये करण म्हणतो की “जेव्हा ती (कंगना) ‘चित्रपट माफिया’ म्हणते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो कारण त्यांना वाटते की आम्ही काय करतो आहोत. त्यांना बसून काम देत नाही? पण असं नाहीये, आम्ही आमच्या इच्छेनुसार काम करतो, कदाचित मला तिच्याबरोबर काम करण्यात रस नसेल म्हणून मी तिला चित्रपटात घेत नाही.”

आणखी वाचा : ‘सर्कस’च्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल पूजा हेगडेने केलं वक्तव्य; म्हणाली “मी थोडी अस्वस्थ…”

करणच्या या वक्तव्यावर कंगनाने एका कार्यक्रमात उत्तर दिलं होतं. त्या उत्तराची क्लिपसुद्धा या व्हिडिओमध्ये जोडलेली आहे. यामध्ये कंगना म्हणाली, “करणने आयफा स्टेजवर माझी कशी चेष्टा केली. तो म्हणाला मी बेरोजगार कसा आहे आणि नोकरी शोधत आहे? ते मला चांगलंच ठाऊक आहे. प्रथम म्हणजे त्याने माझी प्रतिभा पहावी आणि माझे चित्रपट पहावे. खरोखरच त्याला असं वाटतं का की माझ्याकडे काम नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kanganapost
kanganapost

एका फॅन पेजने पोस्ट केलेला व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिलं की, “चाचा चौधरी या क्षुल्लक शब्दांबद्दल धन्यवाद, जेव्हा मी एक फिल्ममेकर आणि निर्माता म्हणून स्वतःला प्रस्थापित करेन तेव्हा मी हेच शब्द तुमच्या तोंडावर फेकीन.” गेल्याच आठवड्यात अशीच एक पोस्ट करण जोहरची चांगलीच शाळा घेतली होती. कंगना लवकरच तिच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.